शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

कुणालचे शेवटचे सेलिब्रेशन ठरले जीवघेणे, तपासात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:29 IST

सातारा : बारावीची परीक्षा संपल्याने आता पुन्हा साताऱ्यात येणे शक्य नसल्याने सैनिक स्कूलमधील मुलांनी सेलिब्रेशन करत तलवात उड्या मारल्या. काहीजण सेल्फी घेत होते तर काहीजण तलावाच्या काठावर बसून फोटो काढत होते. हे पाहून कुणाललाही पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याला पोहता येत नसतानाही त्याने तलावात उडी मारल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकुणालचे शेवटचे सेलिब्रेशन ठरले जीवघेणे, तपासात उघडपोहता येत नसतानाही तलावात उडी

सातारा : बारावीची परीक्षा संपल्याने आता पुन्हा साताऱ्यात येणे शक्य नसल्याने सैनिक स्कूलमधील मुलांनी सेलिब्रेशन करत तलवात उड्या मारल्या. काहीजण सेल्फी घेत होते तर काहीजण तलावाच्या काठावर बसून फोटो काढत होते. हे पाहून कुणाललाही पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याला पोहता येत नसतानाही त्याने तलावात उडी मारल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या कुणाल कृष्णा वाणी (वय १७, रा. नाशिक) याचा रविवारी दुपारी चार वाजता स्कूलमधील पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू झाला होता. हा प्रकार नेमका कसा घडला, याची पोलिसांनी माहिती घेतली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. कुणाल हा सहावीपासून सैनिक स्कूलमध्ये शिकत होता.सहा वर्षे त्याने साताऱ्यात व्यथित केल्यामुळे त्याच्या वर्गातील मित्रपरिवारही मोठा होता. बारावीची परीक्षा संपल्याने मित्रांनी सैनिक स्कूलमधीलच तलावात पोहोण्याचा बेत आखला. रविवारी सुटी असल्यामुळे तलावाला कुलूप लावले होते. असे असतानाही काही मुले भिंतीवरून उड्या मारून तलावात पोहोण्यासाठी उतरली. यावेळी कुणाल वाणीही त्यांच्यासोबत होता.इतर मुले तलावात उड्या मारून पोहू लागली. त्यावेळी कुणाल काठावर बसून मित्रांसोबत सेल्फी घेत होता. अनेक फोटो त्याने मित्रांसोबत काढले. मात्र, काहीवेळानंतर त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने थेट तलावात उडी मारली. इतर मुलांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. काही क्षणातच तो बुडाला. अशा प्रकारे सेलिब्रेशनच्या नादात कुणालला आपला जीव गमवावा लागला. रविवारी रात्री एक वाजता त्याचे आई-वडिल नाशिकहून साताऱ्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास कुणालचा मृतदेह नाशिकला नेण्यात आला.अन् मुले रांगेत उभी राहिली..सर्व मुले तलावातून बाहेर आल्यानंतर रांगेत उभी राहिली. आपण कितीजण होतो, हे मुले पाहत असतानाच तलावात कुणाल पालथ्या अवस्थेत मुलांना दिसला. काही क्षणातच मुलांनी तलावात उड्या मारून कुणालला तलावातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार सैनिक स्कूलमधील प्रशासनाला सांगितला.

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीSatara areaसातारा परिसर