शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बनावट सोन्याचे बिस्किट देत लूटमार; कऱ्हाडात बिहारी टोळीचा पर्दाफाश, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:05 IST

पाच जण पसार 

कऱ्हाड : सोन्याची बनावट बिस्किटे देऊन वृद्ध महिलांकडील सोन्याचे खरे दागिने लुटणाऱ्या बिहारच्या टोळीचा कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. तर, पाच जण पसार झाले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अटक केलेल्या चोरट्याकडून पोलिसांनी दीड तोळ्याची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे.विरेंद्र साहू (वय ३२, मूळ रा. बिहार, सध्या रा. कऱ्हाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील बेलवडे येथील अनिता अशोक तर्टे यांना दोन दिवसांपूर्वी कऱ्हाडच्या बस स्थानक परिसरात भामट्यांनी बनावट सोन्याचे बिस्किट देऊन त्यांची दीड तोळ्याची सोन्याची चेन लुटली होती. याबाबत अनिता तर्टे यांनी कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली.गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह उपनिरीक्षक आंदलकर, धीरज कोरडे, मोहसीन मोमीन, अनिल स्वामी, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ, अमोल देशमुख हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना, शिराळा व पलूसमध्येही अशाच चोऱ्या झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सापळा रचला असता, या गुन्ह्यांमध्ये सहा जणांची टोळी असल्याचे समोर आले.या टोळीच्या कऱ्हाडातील राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी विरेंद्र साहू पोलिसांच्या हाती लागला, तर अन्य पाच जण पसार झाले. पळून गेलेल्या पाच जणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या टोळीने साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही गुन्हे केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच, अन्यही काही जिल्ह्यांत गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर तपास करीत आहेत.

घरातून पॉलिश पावडर हस्तगतपोलिसांनी छापा टाकण्यापूर्वी सुमारे अर्धा तास आधी टोळीतील पाचजण घरातून बाहेर गेले होते. अर्ध्या तासापूर्वी पोलिसांनी छापा टाकला असता, तर संपूर्ण टोळीच पोलिसांच्या हाती लागली असती. पोलिसांच्या हाती लागलेल्या विरेंद्र साहू यानेही पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडून गोल्ड पॉलिश, चांदी पॉलिश पावडर आणि सोन्यासारखे दिसणारे बिस्किट हस्तगत करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस