शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शेतकऱ्यांना बिलांचा एकच आकडा

By admin | Updated: September 15, 2014 00:12 IST

महावितरणचा अजब कारभार : कृषिपंपांना सरसकट ६३९ युनीटचे बिल

औंध : खटाव तालुक्यात पावसाचा अधून-मधून शिडकावा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना कृषिपंपांची गरज नसताना अव्वाच्या सव्या बिल येऊ लागले आहेत. तीन अश्वशक्तीचे कृषिपंप वापरणाऱ्यांना सरसकट ६३९ युनीट व पाच अश्वशक्तीचे कृषिपंप वापरणाऱ्यांना १,०६५ युनीट आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गोपूज परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, औंध उपविभागाच्या गोपूज आणि परिसरातील शेतकरी कृषिपंप वापरत आहेत. कृषी संजीवनी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली जात आहे. ज्यांच्या मीटरमध्ये अजून ६३९ रिडिंंगच झालेले नाही. त्यांनाही चक्क ६३९ युनीटप्रमाणे बिलाची आकारणी केली आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या नवीन जोडणीच्या मोटारी बसवल्याच नाहीत त्यांनाही बिल दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वीजवितरण कंपनीने कृषिपंपाचे बिल दिलेल्यामध्ये मीटर रिडिंगचा फोटो काढलेला नाही. त्यामुळे आलेले बिल व प्रत्यक्षात झालेला विजेचा वापर यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे. त्यामुळे कृषी संजीवनी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना की वीजवितरण कंपनीला, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. आयोगाकडून येणाऱ्या अनुदानासाठी सर्वांना एकसारखी बिले देऊन वीजवितरण कंपनीने त्यांच्यात तारतम्य नसल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे, असाही आरोप शेतकरी करत आहेत. चालू रिडिंगप्रमाणे बिले दिल्यास ते भरण्यास तयार आहेत. मात्र, न वापरलेले विजेचे बिल भरणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे.पत्रकावर दत्तात्रय घार्गे, नितीन घार्गे, विनोद पाटील, नितीन शिंदे, सुनील कुलकर्णी, मोहन खराडे, नारायण घार्गे, महादेव जाधव, संजय चव्हाण आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)