जावळीत मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:36 IST2021-01-18T04:36:10+5:302021-01-18T04:36:10+5:30

कुडाळ : जावळी तालुक्यातील निवडणूक झालेल्या ३७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व निकाल दुपारपर्यंत जाहीर होतील, ...

Jawali counting system ready | जावळीत मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

जावळीत मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

कुडाळ : जावळी तालुक्यातील निवडणूक झालेल्या ३७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व निकाल दुपारपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती तहसीलदार तथा परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.

जावळी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित ३७ ग्रामपंचायतींसाठी ७२ प्रभागांतून २४२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतमोजणीसाठी मेढा याठिकाणी तहसील कार्यालयाच्या आवारात मंडप उभारण्यात आला आहे. यासाठी २४ टेबल तयार करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सात फेऱ्यांत ही मतमोजणी पार पडणार आहे. अंदाजे दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील. मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Jawali counting system ready