शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: अनोखी परंपरा! महिलांनी सुखेड अन् बोरीच्या ओढ्यावर वाहिली शिव्यांची लाखोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:55 IST

सनई, हलगीच्या तालावर वाजत-गाजत शिव्यांच्या भडिमारात रंगला बोरीचा बार

लोणंद : संपूर्ण महाराष्ट्रात शिव्या देण्याची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने बुधवारी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी दरम्यान वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही तीरावर मोठ्या उत्साहात पार पडला. दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत-गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत ही अनोखी परंपरा कायम ठेवली.नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात.‘बोरीचा बार’ सुरू होताना दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात. त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करतात. श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावांतील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढ्यापर्यंत गेल्या.

यंदा ओढ्याला पाणी कमी..यंदा ओढ्याला पाणी कमी असल्याने त्यांनी सुरुवातीला ओढ्याच्या काठावर उभे राहून पैलतीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करीत बोरीच्या बाराची सुरुवात केली तर नंतर दोन्ही बाजूकडील महिलांनी हातवारे करत यंदाचा बार उत्साहात साजरा केला. यावेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता.

अनेक वर्षांची परंपरा..या ‘बोरीच्या बार’संदर्भात एक दंतकथा आहे. एक पाटील होते. त्यांना दोन बायका होत्या. पैकी एक सुखेड, तर दुसरी बोरी या गावातील होत्या. त्या दररोज दोन्ही गावांची शिव असणाऱ्या ओढ्यावर धुणे धुण्यासाठी येत होत्या. ओढ्यावर दोघी एकत्र आल्यावर त्यांच्यात वाद होऊन दोघी एकमेकींना हातवारे करत शिव्या द्यायच्या. यावरून ‘बोरीचा बार’ अशी प्रथा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. दोन्ही गावांतील सासरी गेलेल्या महिलासुद्धा माहेरी येतात. केवळ जिल्ह्यातून नव्हे, तर इतर जिल्ह्यांतूनही हा ‘बोरीचा बार’ पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते. दरम्यान, या पारंपरिक सोहळ्यात सुमारे दीड ते दोन हजार महिला सहभागी झाल्या होत्या.