शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भरवर्गात गुरूजींना सोशल मिडीयाचे वेड!

By admin | Updated: July 14, 2015 21:26 IST

शाळांतील स्थिती : ज्ञानदान करतानाच खणाणतोय मोबाईल; आदेशाची पायमल्ली

कऱ्हाड : शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातून आलेला ताजा भाजीपाला विकत घ्यावा यासाठी पालिकेने शहरात तीन ठिकाणी भाजी मंडई बांधली. त्यातून शेतकरी दररोज आपल्या शेती मालाची विक्री करू लागला. भाजी विक्रेत्यांनी पालिकेने एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गंत १९८४ साली बांधलेल्या संभाजी भाजी मार्केटमध्ये भाजी विक्री करण्यास विरोध दर्शवत पुन्हा आपल्या शेतीमालाची विक्री गुजर हॉस्पीटल परिसरातील रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेत शेतकरी बसू लागले आहेत. त्यामुळे एकीकडे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले संभाजी भाजी मार्केट ओस पडून राहत आहे. तर दुसरीकडे शेतकरी मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून आपला शेतीमाल विकत असल्याने वाहतूक कोंडींसारख्या समस्या उद्भवत आहेत. शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी भाजी मार्केटला समांतर पर्याय म्हणून कऱ्हाड नगरपालिकेने छत्रपती संभाजी मार्केट बांधून त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी सोय केली. त्यातून सुरूवातीला भाजीमार्केट चांगले चालले. नंतर मात्र, या ठिकाणी धंदा होत नसल्याने भाजी विके्रत्यांनी पाठ फिरवल्याने हे मार्केट कायमचे बंद झाले. पालिकेने जवळपास तीनवेळा हे मार्केट सुरू करण्याचा प्रयत्नही केला पण त्यास यश आले नाही. मात्र, प्रत्येकवेळी असाच प्रकार घडत असल्याने पालिकेने केलेला खर्च हा ‘क चऱ्यात ’ गेला आहे. संभाजी मार्केट सुरू ठेवण्यासाठी रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवर अनेकवेळा पालिकेने कारवाईचा बडगाही उगारला. पालिकेने भाजी विक्रेत्यांवर सक्ती करत त्यांनी आपला शेतीमाल प्रत्येक रविवार व गुरूवारी बाजाराच्या दिवशी संभाजी भाजी मार्केटमध्येच बसून विकावा अशा सुचना केल्या. त्यासाठी पूर्वीच्या जागी भाजी विक्रेत्यांचे गाडे, ठिकाण हे उद्वस्थही केले. त्यानंतर थोडी दिवस शेतकरीही या ठिकाणी बसून आपला शेती माल विकू लागले. मात्र, आता याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसून भाजी विक्री करत आहेत.पालिकेने नवीन बांधलेली भाजी मंडई इमारत अपुरी पडत असून त्या ठिकाणी अद्यापही काही सोयी उभारण्यात आल्या नाहीत. संभाजी मार्केट या ठिकाणीही अशाच प्रकारची गैरसोय शेतकऱ्यांची होत असल्याने या ठिकाणी आपला धंदा ही होत नसून आर्थिक तोटा सहन करावा लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी न बसण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी पुन्हा गुजर हॉस्पीटल परिसरात बसून आपला भाजीविक्रीचा धंदा सुरू केला आहे. भाजी मंडईमध्ये साचत असलेल्या कचऱ्यापासून अनेक आजारांचा फैलाव होत आहे. ताजा माल असूनही भाज्यांवर बसणाऱ्या माश्यांमुळे व जवळच्या कचऱ्यामुळे आजार होण्याच्या भितीने नागरिकांकडून भाजी खरेदी केला जात नाही. त्याचा तोटा शेतकरी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. पालिका अन् शेतकरी यांच्यातील वादामुळे भाजी मार्केटचा प्रश्न मात्र अजूनही अधांतरी आहे. भाजी मार्के टमध्ये सर्व सुविधा उभारल्या असल्याचे पालिका सांगत आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी आपला धंदा होत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी बसण्यास नकार दिला आहे. (प्रतिनिधी)इमारतीत व्यवसाय होत नाहीपालिकेच्या संभाजी भाजी मार्केटमध्ये इमातीमध्ये लोक येत नाहीत. तसेच होलसेल भावाने मालाची विक्री काही विक्रेत्यांकडून केली जात असल्याने दिवसाला दहा किलोही माल इमारतीमध्ये बसल्यावर विकला जात नाही. त्यामुळे बाहेर बसावे लागते, अशी प्रतिक्रिया टेंभूतील एका शेतकरी विक्रेत्याने दिली. मात्र, संबंधित विक्रेत्याने आपले नाव सांगण्यास नकार दिला.