शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस!

By admin | Updated: July 16, 2015 21:29 IST

१,८४० अर्ज दाखल : अमावस्या संपताच तहसील कचेऱ्यांत गर्दी

सातारा : जिल्ह्यातील ७११ सार्वत्रिक आणि १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय परिस्थिती चांगलीच ढवळून निघाली आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेली अमावस्या गुरुवारी सकाळी संपल्यानंतर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग वेगाने सुरू झाली. गुरुवारी एका दिवसात विक्रमी १,८४० उमेदवारी अर्ज जिल्हाभरात दाखल झाले. राजकीय क्षेत्रात मुहूर्ताला मोठे महत्त्व आहे. अमावस्येला उमेदवारी अर्ज भरल्यास ते अडचणीचे ठरू शकते, असा सार्वत्रिक समज आहे. किंबहुना राजकीय क्षेत्रात हा समज जास्त असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीवरून समोर आले. गुरुवारी अमावस्या संपली आणि गावागावांतील गटातटाची मंडळी गुरुवारी मोठ्या संख्येने तालुक्याच्या गावांत जाऊन धडकली. कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ५०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवारअखेर जिल्हाभरात २ हजार ८६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २० जुलैअखेर आणखी उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने राजकीय रंगत वाढली आहे. गुरुवारी तालुकानिहाय दाखल झालेल्या अर्जांची आकडेवारी अशी : फलटण : २१८, जावळी : १०३, सातारा : ६८, कोरेगाव : १२६, कऱ्हाड : ५०५, पाटण : २०१, वाई : १०७, महाबळेश्वर : ४६, खंडाळा : ११२, खटाव : ११३, माण : १३६, एकूण : १,८४०. जिल्ह्याच्या पारांवर राजकीय चर्चांना ऊत आला आहे. (प्रतिनिधी)निवडणूक याद्यांनी घरे फोडलीग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार असलेल्या मतदार याद्यांमध्ये फारच मजेशीर प्रकार पाहायला मिळत आहेत. एकाच घरातील मते वेगवेगळ्या ठिकाणी फुटली आहेत. विशेष म्हणजे, पतीचे नाव जर वॉर्ड १ मध्ये असेल, तर पत्नीचे नाव वॉर्ड २ मध्ये घातले गेले आहे. अनेक मृत लोकांची नावेही मतदार यादीत आलेली आहेत. सदोष मतदार याद्यांमुळे उमेदवारांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे.