शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चारशे वर्षांपूर्वीचे मंदिर दुर्लक्षित

By admin | Updated: February 4, 2015 23:53 IST

कार्वेचे धानाई देवी : रस्ता रूंदीकरणासह निवासस्थान होणे गरजेचे, सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

युवराज मोहिते - कार्वे  येथील ग्रामादैवत व पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकचे श्रद्धास्थान असणाऱ्या चारशे वर्षांपूर्वीच्या धानाईदेवी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. सोयी-सुविधा मिळत नसल्याने देवीच्या दर्शनासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.  कार्वे गावापासून तीन किलोमीटर व कऱ्हाड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर ‘वाघ’ नावाच्या शिवारात सुमारे चारशे वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेले धानाईदेवी मंदीर आहे. एक-एकर क्षेत्रात मोठ्या घडीव दगडांमध्ये या मुळ मंदिराची उभारणी करण्यात आली होती़ मात्र, कालांतराने या मंदिराची पडझड झाली. त्यामुळे मंदिराचा जिर्णोध्दार करावा, अशी ग्रामस्थांसह भाविकांचीही मागणी होती.  त्याबाबत देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापकांनाही ग्रामस्थांकडून विनंती करण्यात आली. मंदीराच्या जिर्णाेद्धारासाठी अर्थिक मदत देण्याची तयारीही ग्रामस्थांकडून दर्शविली. वैद्यकीय अधिकारी डॉ़ भगवान थोरात यांनी याबाबत काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला. मंदीराच्या जिर्णाेद्धारासाठी त्यांनी गावातील युवकांना हाक दिली़ मंदिर जिर्णाेध्दाराबाबत चर्चा करण्यासाठी संबंधित युवकांना त्यांनी मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन केले़ त्यानुसार मोठ्या संख्येने युवक मंदिरामध्ये जमले. पुरातन दुरवस्था झालेले मंदिर उतरवून त्याठिकाणी नवीन मंदिर बांधण्याचा निर्धार त्यावेळी व्यक्त करण्यात आला. श्रमदानातून जुने मंदिर उतरविण्यात आले. तसेच जिर्णाेध्दारासाठी अपेक्षित सुमारे दोन कोटींच्या घरात असलेल्या खर्चाची रक्कम उभी करण्यासाठी ग्रामस्थांनी त्याच्या शेतातील ऊस उत्पादनातून प्रतिटन २५ ते ४० रूपये मंदिराच्या उभारणीसाठी दिले. तसेच संबंध महाराष्ट्रातील भाविकांनीही मंदीराच्या जिर्णाेद्धारासाठी सढळ हस्ते मदत केली.  मंदिर परिसरात निवासस्थानची सोय नाही. त्यामुळे परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. मंदी परीसरात स्वच्छताही ठेवली जात नाही. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदिकरण करणेही गरजेचे आहे. तसेच परिसरात वाहनतळाची व्यवस्था करावी. उन्हात तसेच पावसात दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना दर्शनमार्गात शेडची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मंदिर परिसरातील वाढलेली झुडपे-गवत काढून बगिचा करण्यात यावा, अशा मागण्या भाविकांकडून होत आहेत़ तसेच मंदिर आवारात सी़ सी़ टी. व्ही. बसविणेही आवश्यक आहे. ऐतिहासिक वारसा जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टबरोबरच प्रशासनानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. कायम सुरक्षा रक्षकाची गरजमंदीराचा जिर्णाेद्धार झाल्यामुळे येथील रूपडेच पालटल्याचे सध्या दिसून येत आहे. मात्र, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अद्यापही म्हणाव्या तशा सोयीसुविधा मिळत नाहीत. येथे सेवकांचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारीही उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसरात येत असलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरुप रक्षक नेमण्याची गरज आहे.