शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत महिला वकील जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सेवा रस्त्यावर एका चारचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात महिला वकील जखमी झाल्या. ...

सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सेवा रस्त्यावर एका चारचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात महिला वकील जखमी झाल्या. श्रद्धा गुजर असे जखमी महिला वकिलाचे नाव असून याप्रकरणी श्रीपाद पवार याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या अपघातानंतर श्रीपाद पवार हा जखमी श्रद्धा यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात न दाखल करता तेथून पळून गेला आहे. ही घटना शुक्रवार, दि. १६ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रद्धा प्रभाकर गुजर (वय २६, रा. अहिरे कॉलनी, देगाव रोड, संभाजीनगर, सातारा) या त्यांची दुचाकी (एमएच ११ बीआर ३०२५) घेऊन बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील बालाजी हॉटेलसमोर थांबल्या होत्या. याचवेळी अजंठा चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक सेवा रस्त्याने श्रीपाद सुरेश पवार (वय ३४, रा. सुरूर, ता. वाई, जि. सातारा) हे त्यांच्या ताब्यात असलेली कार (एमएच १२ एनबी २६३२) हयगय आणि अविचाराने तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत होते. यावेळी श्रीपाद याने श्रद्धा यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात श्रद्धा यांच्या उजव्या पायाला आणि डाव्या पायाच्या नडगीला जखम झाली. दरम्यान, या अपघातानंतर श्रीपाद पवार हा जखमी श्रद्धा यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात न दाखल करता तेथून पळून गेला. ही घटना दि. १६ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रद्धा यांनी दि. १७ रोजी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर श्रीपाद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.