शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तोडगा निघेपर्यंत ‘इमर्सन’मधील मशिनरी हलवू नये : शशिकांत शिंदे

By admin | Updated: May 25, 2015 00:36 IST

कामगार आयुक्त बैठक : सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीतील मे. इमर्सन नेटवर्क पॉवर (इं) प्रा. लि. कंपनीतील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत व्यवस्थापनाने कंपनीतील उत्पादन व मशिनरी हलवू नये, अशी ठाम मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. यावर व्यवस्थापनातर्फे अ‍ॅड. निर्मल यांनी कामगारांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेऊ असे, आश्वासन दिले. पुणे येथील अपर कामगार आयुक्त कार्यालयात इमर्सन कंपनी बंद झाल्याबाबत बैठक झाली. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, सहायक कामगार आयुक्त सु.बा. बागल, शैलेंद्र पोळ, सरकारी कामगार अधिकारी पी. बी. जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी आर. एम. निर्मल, कामगार प्रतिनिधी विठ्ठल गोळे, गोरखनाथ नलावडे, अण्णासाहेब कांबळे आदी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘इमर्सन कंपनी अचानकपणे बंद करण्यात आलेली आहे. कामगारांच्या भवितव्याचा विचार न करता ही कंपनी बंद केली आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनीने पूर्ववत आपले काम सुरू करावे. कामगारांना नियमित रोजगार उपलब्ध करून द्यावा. व्यवस्थापनाची आर्थिक अडचण असेल तर त्यांनी ले आॅफ द्यावा आणि सहा महिने कारखाना चालवावा. सहा महिन्यात कंपनीचा व्यवसाय वाढल्यास पूर्ववत कामकाज सुरू होईल. कंपनी म्हणते मालाला ३० टक्केच उठाव आहे. तर त्यांनी ५० टक्के कामगारांना कामावर घ्यावे. सर्व कामगार एक-एक महिना आलटून पालटून दरमहा काम करतील. नोकरी गेली तरी कामगार शांततेने निषेध व्यक्त करीत आहेत. व्यवस्थापनाने त्यांच्यावर खोट्या केसेस करू नयेत. योग्य तोडगा निघेपर्यंत कामगार शांततेचाच अवलंब करतील, असे आश्वासनही आमदार शिंदे यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)