शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोघांच्या मृत्यूने धडधड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधुन-मधून वाढत असल्याने नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढू लागली आहे. बुधवारी माण आणि ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधुन-मधून वाढत असल्याने नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढू लागली आहे. बुधवारी माण आणि खटाव तालुक्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अचानक बळींची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, रात्री नवे ५६ रुग्ण आढळून आले असून, बाधितांची संख्या ५४ हजार ९९८ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार आता पूर्वपदावर आले असतानाच, बुधवारी दोन बाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सूर्याचीवाडी, (ता. खटाव) येथील ५७ वर्षीय महिला तसेच कासारवाडी, (ता. माण) येथील ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. बळींची संख्या आता १ हजार ७९७ वर पोहोचली आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्युसत्र आटोक्यात आले होते. परंतु अधुन-मधून एक-दोघांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

जिल्ह्यात कोरोनामुक्तीचेही प्रमाण वाढले असून, बुधवारी दिवसभरात ४३ जण, तर आतापर्यंत ५२ हजार ४५४ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोना संपला, अशा भाबड्या कल्पनेत न रमता नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे गरजेचे आहे. अनेकजण विनामास्क फिरत असताना दिसून येत आहेत. अशा लोकांवर आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

चौकट :

तपासणीसाठी पुन्हा गर्दी..

गत आठ दिवसांपासून रुग्णालयात तपासणीसाठीही गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसांत तब्बल ११५२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामधून ५६ जण बाधित आढळून आले. काहीजण तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. नागरिकांनी अंगावर आजार काढू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.