ती गर्दी मंत्री राठोडांनी जमविली नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST2021-02-25T04:53:47+5:302021-02-25T04:53:47+5:30

मंत्री देसाई यांनी कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ...

That crowd was not gathered by Minister Rathore | ती गर्दी मंत्री राठोडांनी जमविली नव्हती

ती गर्दी मंत्री राठोडांनी जमविली नव्हती

मंत्री देसाई यांनी कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री देसाई म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार एकदम सकारात्मक आहे .सुप्रीम कोर्टातील केस जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्याबरोबर झालेल्या भेटीत त्यांना दिली आहे .

जिल्हा बँक निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होईल का ? याबाबत छेडले असता मंत्री देसाई म्हणाले, त्याबाबत मी काही सांगू शकत नाही. मात्र आमच्या पक्षाची बैठक लवकरच होईल व पक्षाची भूमिका आम्ही त्यानंतर माध्यमांना कळवू.

राज्यातील कोरोना रुग्णांचा दर दोन हजाराच्या आत होता. पण सध्या तो सात हजारांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे लोकांनीच काळजी घेण्याची गरज आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे .पण आढावा बैठक घेतल्यानंतर लोक नियम पाळत नसल्याचे समोर येत आहे. परिणामी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मी गृह खात्याला दिल्या असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

Web Title: That crowd was not gathered by Minister Rathore