लोणंद येथील लसीकरण केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST2021-07-02T04:26:44+5:302021-07-02T04:26:44+5:30

लोणंद : कोविडशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी शंभर लस उपलब्ध झाल्या, मात्र यासाठी तीनशे नागरिकांची या ठिकाणी गर्दी पाहावयास मिळाली. ...

Crowd at the vaccination center at Lonand | लोणंद येथील लसीकरण केंद्रावर गर्दी

लोणंद येथील लसीकरण केंद्रावर गर्दी

लोणंद : कोविडशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी शंभर लस उपलब्ध झाल्या, मात्र यासाठी तीनशे नागरिकांची या ठिकाणी गर्दी पाहावयास मिळाली. काहींनी पहाटेच नंबर लावला होता. सकाळी आठपर्यंत आलेल्या पाहिल्या शंभरच नागरिकांना टोकन देण्यात आले.

आरोग्यसेविकांनी इतर नागरिकांना घरी जाण्यास सांगूनही नागरिकांनी रांगा लावल्या. काही काळ तर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासून भर उन्हात शेकडो नागरिक अकरा वाजेपर्यंत उभे होते. अनेक महिलांनी गेल्या पंधरा दिवसांपासून नंबर लावूनही त्यांना दुसरा डोससाठी नंबर येत नसल्याने नाराजी व्यक्त केली. अनेकांना डोस घेऊन शंभर दिवस होऊन गेलेत. त्यांना प्राधान्याने डोस देण्याची मागणी केली जात आहे. गुरुवारी सकाळपासून पडलेल्या कडक उन्हात शेकडो नागरिकांचे होणारे हाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजू इनामदार व सागर शेळके-पाटील यांनी मदत केली.

Web Title: Crowd at the vaccination center at Lonand