शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी टोलमुक्तीचा वटहुकूम काढावा

By admin | Updated: June 27, 2014 00:57 IST

कऱ्हाड बाजार समितीच्या मैदानात ठिय्या : टोलविरोधी कृती समितीचा एकच नारा

मलकापूर : ‘शहराअंतर्गत टोल देशात कुठेही नाही. आंदोलने करून कोल्हापूरवासीयांची सहनशीलता संपली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या अधिकारात कोल्हापूर टोलमुक्तीचा वटहुकूम काढावा; अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापुरात फिरकूही देणार नाही,’ असा इशारा टोलविरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. कऱ्हाड येथील बाजार समितीच्या मैदानात टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कृती समितीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे म्हणाले, ‘कोल्हापूर शहरातील तीन लाख चौरस फुटाचा भूखंड ‘आयआरबी’च्या ताब्यात आहे. त्याचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करावे व आयआरबीने केलेल्या कामाचेही मूल्यांकन करावे. ज्यांचे देणे लागेल, त्यांचे देणे मुख्यमंत्र्यांनी भागवावे. मात्र, हा शहरातील जनतेवरील अन्याय थांबवावा, अन्यथा कोल्हापूरची जनता पेटून उठेल.’ बाबा इंदूलकर म्हणाले, ‘कोल्हापूरची शाहू महाराजांची संस्कृती वेगळी आहे. आंदोलकांना कऱ्हाड शहराच्या एका बाजूला जागा देऊन प्रशासनाने दुजाभाव केला आहे. टोल रद्द हा निर्णय लवकर नाही घेतल्यास शासन व प्रशासनास मोठी किंमत मोजावी लागेल.’ यावेळी दिलीप देसाई, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, चंद्रकांत यादव, दिलीप पोवार, महापौर सुनीता राऊत, ‘जनसुराज्य’चे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे राजू लाटकर, विरोधी गटनेते मुरलीधर जाधव, अनिल राऊत, विनायक फाळके, रमेश पुरेकर, प्रकाश काटे, जयकुमार शिंदे, दीपा पाटील, वैशाली महाडिक, सुचिता साळोखे, सुजाता चव्हाण, आक्काताई जाधव, विजया फुले यांच्यासह सुमारे तीनशे आंदोलक अांदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)