शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ मोठे नेते; महादेव जानकर म्हणाले, दुसरीकडे राहण्यापेक्षा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:10 IST

काेणत्याही मित्रपक्षात नसल्याचेही केले स्पष्ट

सातारा : ओबीसी समाजात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मोठी जागृती केली आहे. ते मोठे नेते आहेत. त्यांना सल्ला देणे बरोबर नाही. पण, दुसऱ्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:ची झोपडी, घर असणे आवश्यक आहे, असे रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी भुजबळ यांच्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिले. तसेच मी कोणत्याही मित्रपक्षात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्मारकस्थळी अभिवादन केल्यानंतर माजी मंत्री जानकर बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक परिवर्तनाचे अजोड काम केले आहे. नायगाव येथे अभिवादन करून आम्ही प्रेरणा घेतो.यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जानकर म्हणाले, भाजप आणि काँग्रेसमध्येही काहीही फरक नाही. त्यामुळे मी महायुती किंवा आघाडीबरोबरही नाही. स्वत:ची ताकद निर्माण करून स्वत:चे राज्य आणणार आहे. एक दिवस फुले विचारांचाच मुख्यमंत्री आम्ही करू. आता दिल्ली आणि बिहार राज्यातही विधानसभा निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रात माझा एक आमदार असून, तिघे जण थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahadev Jankarमहादेव जानकरChagan Bhujbalछगन भुजबळMahayutiमहायुती