शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : ‘शेतकरी, विद्यार्थी, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्व समाज घटकांबरोबरच राज्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : ‘शेतकरी, विद्यार्थी, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्व समाज घटकांबरोबरच राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय प्रलंबित असून, ते केंद्र व राज्य सरकारने तातडीने घ्यावेत,’ अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत केली.

सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यावतीने ५० दिवसीय राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या यात्रेचे आगमन रविवारी (दि. ७) फलटण शहरात झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात समतोल विकासासाठी विशेष मागास जिल्हे, तालुक्यातील विकासाकरिता पुरेसा निधी व पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान कोर्ट किंवा शेतकरी लवादांची निर्मिती करावी, सरकारी नोकर भरतीतील कंत्राटी पद्धत बंद करून तातडीने नोकर भरती करावी, राज्यातील सर्व विद्यार्थी वसतिगृहांचे आधुनिकीकरण करावे, खासगी क्षेत्रात नोकरीमध्ये आरक्षण लागू करावे, राज्यातील मुस्लिमांना मागासलेपणाच्या आधारावर शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे सांगून आगामी काळात केंद्र सरकारच्या नागरिकत्व धोरण व एन. आर. सी.विरोधात पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी सांगितले.