शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार आदर्की बुद्रुकचा, पावती खुर्दची!

By admin | Updated: February 6, 2015 00:40 IST

ग्रामसभेत पंचनामा : थकित कर वसुलीबरोबरच धोम-बलकवडीच्या पाणी विषयावर चर्चा

आदर्की : धोम-बलकवडीचे पाणी आदर्कीच्या ओढ्यात कायमस्वरूपी सोडण्यासाठी दरवजा ठेवणे, ग्रामपंचायत थकित कर वसुली करणे, सर्व गावात स्वच्छता अभियान राबविणे, गराटाची कामे पूर्ण करणे, या विषयांवर चर्चा सुरू असतानाच आदर्की बुद्रुक आठवडा बाजारात कर वसुली पावतीवर आदर्की खुर्द, ता. कोरेगाव असे छापले असल्याने ग्रामसभेत या कारभाराचा पंचनामा करण्यात आला.आदर्की बुद्रुकची ग्रामसभा भैरवनाथ मंदिरात सरपंच उमा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी धोम-बलकवडीचे पाणी आदर्कीच्या ओढ्यात सोडण्याचा ठराव चर्चेला आला. त्यावेळी बाळासाहेब कासार यांनी अधिकारी चाळीस हजार रुपये पाणी कर भरल्यानंतर पाणी सोडणार असल्याचे सांगितले. यावर तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी लाभक्षेत्राबाहेर पाणी जाते, त्याचा पाणी कर कोण भरते, याची माहिती ग्रामपंचायतीने मागवावी, असे सांगितले. ओढ्यावर बांधलेले सिमेंट बंधारे तीन दिवसांत रिकामे होतात, तेव्हा बंधाऱ्याची साईट चांगली निवडण्याची मागणी सागर धुमाळ यांनी केली.ग्रामसेविका व्ही. आर. सोनावणे यांनी गेल्यावर्षीची पाच लाख रुपये कर थकबाकी आहे. कर्मचारी पगार दहा हजार व टीसीएल पावडरवर मोठा खर्च होतो. त्यामुळे गावात विकासकामे होत नाहीत. त्यावर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांनी कर वसुलीस मदत करावी. डॉल्बीच्या प्रश्नी डॉल्बीवर बंदी घालण्यापेक्षा आवाज कमी करण्याची सक्ती करण्याची मागणी केली. यावेळी विश्वासराव धुमाळ, उपसरपंच मोहन खराडे, रमेश पवार, विलास धुमाळ, सर्जेराव पोळ, धोंडिराम कारंडे, विकास काकडे, के. व्ही. अनपट आदी उपस्थित होते. (वार्ताहर)