शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात वाहून गेलेल्या क्षितिजाचा मृतदेह सापडला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 15:17 IST

अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी नातेवाईकांचा ठिय्या

ढेबेवाडी : वांग नदीपात्रातून वाहून गेलेल्या क्षितिजा साठे (वय १२, रा. सणबूर, ता. पाटण) या शाळकरी विद्यार्थिनीचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी रविवारी सकाळी ढेबेवाडी नजीकच्या पूलाजवळ नदीपात्रालगत सापडला. क्षितिजाच्या मृत्यूस वांग धरण बांधकाम प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी नकार देऊन तेथेच ठिय्या मांडला.

वांग नदीवर रविवारी सकाळपासून मोठा जमाव जमला होता. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतल्याने वांग नदीच्या काठावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शंकर साठे (वय ६२) हे त्यांच्या नाती स्वरांजली साठे (वय १०), श्रावणी साठे (वय १०), क्षितीजा साठे (वय १२), हे गुरुवारी,दि. १४ रोजी  सकाळी नऊच्या सुमारास वांग नदीपात्र ओलांडून गावाकडे जात होते.  यावेळी अचानक  पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते मोरेवाडी (कुठरे) नजीकच्या वांग नदीपात्रातून वाहून गेले. मात्र, त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या स्थानिकांनी शंकर साठे यांच्यासह स्वरांजली आणि श्रावणी यांना वाचविण्यात यश आले. तर क्षितिजा पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याने ती सापडू शकली नव्हती. दरम्यान, चार दिवसांपासून नदीपात्रात शोधमोहीम चालू होती. अखेर रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास क्षितिजाचा मृतदेह वांग नदीपात्रात ढेबेवाडीनजीकच्या पूलाजवळ सापडला.मृतदेह सापडल्यानंतर ग्रामस्थांनी वांग नदीकाठी सकाळपासून गर्दी केली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांच्या पंचनाम्याच्या बाबी पूर्ण केल्या. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी  पाठविण्यापूर्वी विरोध केला. या घटनेला जबाबदार असणाºयांवर कारवाई करावी आणि संबंधित अधिकारी येथे आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यूriverनदी