शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉडीबिल्डिंग’च्या निमित्तानं भाजपचं ‘शक्तिप्रदर्शन’

By admin | Updated: April 10, 2015 23:46 IST

उद्या स्पर्धा : अनेक मंत्र्यांची शहरात प्रथमच हजेरी

सातारा : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून ‘लाल दिवा’ बघण्याची सवय मोडलेल्या सातारकरांसाठी रविवारचा दिवस कदाचित पुन्हा वेगळा ठरणार आहे. अखिल भारतीय पातळीवरच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्तानं भाजप, सेना सरकारमधील अनेक मंत्र्यांची फौज सातारा शहरात अवतरणार आहे. अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बॉडीबिल्डिंग’च्या निमित्ताने भाजपचं ‘शक्तिप्रदर्शन’ पाहायला मिळणार आहे.रविवार, दि. १२ रोजी तालीम संघाच्या मैदानावर या स्पर्धा होणार असून, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री विजय शिवतारे, बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, राज्य साखर परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाजप-सेनेचे अनेक आमदार या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहेत. इंडियन बॉडीबिल्डिंग अ‍ॅन्ड फिटनेस फेडरेशन व छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत गोपीनाथ मुंढे यांच्या स्मरणार्थ ५५ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव ‘भारत श्री’ व दहावी ‘मिस भारत श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून सातारा जिल्ह्यात मंत्र्यांचे दौरे जवळपास बंदच झाले होते. शंभूराज देसाई वगळता काँग्रेस अन् राष्ट्रवादीचे आमदार निवडून देणाऱ्या सातारा जिल्ह्यात लाल दिव्याचे दर्शन दुर्मिळ झाले होते. सत्ता आल्यापासून प्रथमच एवढे सारे मंत्री व लोकप्रतिनिधी सातारा शहरात प्रथमच येत आहेत. (प्रतिनिधी) देशभरातील सुमारे सत्तावीस राज्यांतून सहाशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यात दीडशे महिलाही भाग घेणार आहेत. या स्पर्धकांसाठी तब्बल तीन लाख अंडी व चार टन चिकन खाद्याची सोय करण्यात आलीय. - रवींद्र पवार, संयोजक