आंब्रळ येथे शाळेच्या वाढीव बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:24 IST2021-06-30T04:24:51+5:302021-06-30T04:24:51+5:30

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वाढीव कामाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या ...

Bhumipujan of the extended construction of the school at Ambral | आंब्रळ येथे शाळेच्या वाढीव बांधकामाचे भूमिपूजन

आंब्रळ येथे शाळेच्या वाढीव बांधकामाचे भूमिपूजन

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वाढीव कामाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचे औचित्त साधून राजेंद्र राजपुरे यांच्या उपस्थितीत प्राथमिक शाळेच्या वाढीव कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गावातील मारुती आंब्राळे व दत्तू आंब्राळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. कार्यक्रमास सरपंच माधुरी आंब्राळे, उपसरपंच उमेश जाधव, ग्रामसेवक वैभव काळे, ग्रामपंचायत सदस्य सारिका आंब्राळे, माधुरी जंगम, सरिता आंब्राळे, प्रल्हाद आंब्राळे, गोपाळ आंब्राळे, तुकाराम आंब्राळे, दिलीप आंब्राळे उपस्थित होते.

राजेंद्र राजपुरे म्हणाले, ‘‘गावातील शाळांचे तटभिंती, सुसज्ज वर्ग खोल्यांसह विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. त्याची पूर्तता होत असून, भूमिपूजन करताना विशेष आनंद होत आहे.’’

यावेळी राजेंद्र राजपुरे म्हणाले, ‘‘गावातील शाळांचे तटभिंती, सुसज्ज वर्ग खोल्यांसह विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. त्याची पूर्तता होत असून, भूमिपूजन करताना विशेष आनंद होत आहे.’’

Web Title: Bhumipujan of the extended construction of the school at Ambral