शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर भेट.. तुला दाखवतोच!, सातारा कारागृहातच कैद्याकडून कर्मचाऱ्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:03 IST

सातारा : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका बंदिवानाने कारागृहातील पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे ...

सातारा : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका बंदिवानाने कारागृहातील पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर ‘मी बाहेर पिस्तूल उतरवलंय, तुला दाखवतोच तू बाहेर भेट,’ अशी त्याने धमकी दिली. ही घटना बुधवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. याप्रकरणी एका बंदिवानावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऋषिकेश शशिकांत पवार असे गुन्हा दाखल झालेल्या बंदिवानाचे नाव आहे. कारागृहातील कर्मचारी प्रेमनाथ वाडीकर (वय ३५) हे बुधवारी सायंकाळी ड्यूटीवर आले. सर्कल नंबर दोन येथे ते उभे असताना बंदिवान ऋषिकेश पवार हा त्यांच्याकडे बघून त्यांना खुन्नस देऊ लागला. प्रेमनाथ वाडीकर यांनी काही दिवसांपूर्वी बंदी ऋषिकेश पवार व पवन देवकुळे यांचा वाद सोडवला होता. याचा राग मनात धरून ‘तुझा काय संबंध मला बाहेर काढायचा. तू आमची भांडणे का सोडवलीस. तू बाहेर भेट तुला दाखवतोच. मी बाहेर पिस्तूल उतरवले आहे,’ असे म्हणून त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर ‘तुला आता जिवंत सोडणार नाही’ अशी त्याने धमकी दिली.या प्रकारानंतर प्रेमनाथ वाडीकर यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री आठ वाजता तक्रार दिली. पोलिसांनी बंदिवान ऋषिकेश पवार याच्यावर भारतीय न्याय संहिता १३२, ३५२, ३५१ प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हवालदार यादव हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस