शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरनंतर महाबळेश्वरमध्ये होणार केशर उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 02:40 IST

समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार मीटर उंचीवर सरासरी दहा डिग्री तापमानामध्ये हे पीक घेतले जाते. कंदाद्वारे एक फूट अंतरावर याची लागवड केली जाते

दिलीप पाडळेपाचगणी (सातारा) : ‘स्ट्रॉबेरी हब’ असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये केशर लागवडीचा प्रयोग करण्यात येत आहे. थंड वातावरण, केशर लागवड योग्य जमीन असल्याने कृषी विभागाने प्रोत्साहन दिल्याने क्षेत्र महाबळेश्वर येथील प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे, मेटगुताड येथील दीपक व अशोक बावडेकर यांनी आपल्या क्षेत्रामध्ये केशरची लागवड केली आहे.

समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार मीटर उंचीवर सरासरी दहा डिग्री तापमानामध्ये हे पीक घेतले जाते. कंदाद्वारे एक फूट अंतरावर याची लागवड केली जाते. पंधरा ते पंचवीस सेंटीमीटर असे फूलझाड वाढत असते. यातील गवतापासून निमुळती होत जाणारी पाने येतात. फुले जांभळट रंगाची असतात.  याच्यात पिवळसर कोश तयार होतो. त्यालाच ‘केशर’ असे म्हणतात. केशरची लागवड ऑगस्ट सप्टेंबरमध्ये केली जाते. डिसेंबर-जानेवारीत फुले येतात. ती खुडून उन्हात वाळवून त्यापासून केशर मिळवतात.

महाबळेश्वरला केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीबरोबरच केशरचे भक्कम उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. येथील स्ट्रॉबेरी जशी जगप्रसिद्ध आहे तसेच केशरही जगप्रसिद्ध होईल. - दीपक बोर्डे, कृषी सहायक

हिमालयन केशरnजगभरात केशराच्या हिमालयन, अमेरिकन, अफगाण व चायना अशा जाती आहेत. हिमालयन केशर म्हणजे काश्मिरी केशर. ते सर्वोत्कृष्ट मानले जाते. या केशरचा भाव सरासरी साडेतीन लाख रुपये किलो असतो.  nजगामध्ये स्पेन, इराक, फ्रान्स, इटली, तुर्की, चीन येथे केशरचे पीक घेतले जाते. तर काश्मीरमध्ये पंपोरे व किश्तवाड येथे पिकवले जाते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर