शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळी पर्यटक आढळल्यास कारवाई होणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

पाचगणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचगणी या पर्यटनस्थळावर पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी करण्यात आली असून, शनिवार व रविवारी संचारबंदी लागू करण्यात ...

पाचगणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचगणी या पर्यटनस्थळावर पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी करण्यात आली असून, शनिवार व रविवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कलम १४४ नुसार शनिवार व रविवार तसेच हॉटेल, लॉजिंग व बंगलोधारकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदीदरम्यान व्यवसाय करताना कोणी सापडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

याबाबत त्यांनी काढलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केलेली आहे. तरी सर्व पर्यटकांना व पाचगणी आणि लगतच्या ग्रामीण परिसरातील सर्व हॉटेल, लॉज व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की, शासनाने कोविड-१९ अंतर्गत पर्यटनस्थळ बंद ठेवण्याबाबत आदेश दिले असून, संचारबंदी लागू केलेली आहे. तरी पर्यटकांनी शनिवार व रविवार या दिवशी पाचगणी आणि लगतच्या ग्रामीण परिसरात पर्यटनासाठी येऊ नये. तसेच पर्यटकांसाठी सर्व हॉटेल, लॉज, बंगलोधारकांना लॉजिंग-बोर्डिंग व्यवसाय करता येणार नाही.

अशा प्रकारचे कोणतेही स्वरूपाचे व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन शेवटी पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.