'काँग्रेस'चा एक ज्येष्ठ नेताही सोडणार 'हात'! जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती 'भाजप'च्या गळाला

By प्रमोद सुकरे | Updated: June 9, 2025 23:06 IST2025-06-09T23:05:31+5:302025-06-09T23:06:14+5:30

पाटण तालुका जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो.त्यामुळे तो वेगवेगळ्या खोऱ्यात विखुरलेला आहे.त्यापैकीच एक खोरे म्हणजे ढेबेवाडी होय.

A senior Congress leader Hindurao Patil will also give up his 'hands'! Former Agriculture Chairman of Zilla Parishad is at the mercy of 'BJP' | 'काँग्रेस'चा एक ज्येष्ठ नेताही सोडणार 'हात'! जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती 'भाजप'च्या गळाला

'काँग्रेस'चा एक ज्येष्ठ नेताही सोडणार 'हात'! जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती 'भाजप'च्या गळाला

- प्रमोद सुकरे 

लोकमत न्यूज नेटवर्क 

पाटण तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हिंदुराव पाटील गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या मेळात कोठेच दिसत नाहीत.त्यामुळे ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा तर सुरुच आहेत ‌.पण आता ते भाजपच्या गळाला लागल्याच्या चर्चा ही सुरु झाल्या आहेत.त्यांनी तसा निर्णय घेतलाच तर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातही राजकीय भूकंप होईल असे बोलले जातेय.

पाटण तालुका जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो.त्यामुळे तो वेगवेगळ्या खोऱ्यात विखुरलेला आहे.त्यापैकीच एक खोरे म्हणजे ढेबेवाडी होय.येथील बहुतांश लोक मुंबईत उपजिवेकेसाठी आहेत.अनेक वाड्या वस्तीत येथील लोक रहातात.पण येथील जनता राजकीय दृष्ट्या जागृत मानली जाते.

खरंतर हा भाग पूर्वी कराड दक्षिण मतदारसंघात होता.त्यावेळी विलासराव पाटील उंडाळकर या मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते.त्यामुळे येथे काँग्रेसची पाळेमुळे चांगली रोवली गेली होती.तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मुळ कुंभारगाव सुध्दा याच खोऱ्यात येते‌ त्याचाही प्रभाव येथे दिसून आला.म्हणून तर पुढे पाटण तालुक्याचे राजकारण देसाई- पाटणकर गटाभोवतीच फिरत असताना हिंदुराव पाटील यांनी अनेक वर्ष येथे जिल्हा परिषद गटावर आपला प्रभाव कायम ठेवला होता.

आता मात्र हेच पाटील काँग्रेस व नेत्यांवर नाराज आहेत.त्यामुळेच त्यांनी अलिकडे पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळते.त्यांच्या या सततच्या अनुपस्थितीची चर्चा तर होणारच! आता तर त्यात ते भाजपच्या गळाला लागलेच्या चर्चेने भरच घातली आहे.बघूया या चर्चा खर्या ठरतात का?

पाटलांनी केला भाजप अध्यक्षांचा सत्कार!

महिन्याभरापूर्वी भाजपच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहिर झाल्या.त्यात ढेबेवाडी साईगडेचे गणेश यादव भाजपचे तालुकाध्यक्ष झाले.विशेष म्हणजे या अध्यक्षांच्या चक्क हिंदुराव पाटील यांनी सत्कार केला.तो फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाला.त्यामुळे पाटीलही भाजपच्याच वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.

आज प्रवेशाची शक्यता!

पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर हे मंगळवार दि. १० रोजी मुंबई येथे मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यादरम्यानच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील देखील समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

अशी आहे त्यांची राजकीय कारकीर्द ..

हिंदुराव पाटील हे काँग्रेसच्या नेत्या प्रेमालाताई चव्हाण यांच्या पासून राजकारणात सक्रिय आहेत.सुरुवातीला त्यांनी पाटण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले.त्यानंतर तब्बल २० वर्षे  जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले.यादरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापतीपद भूषवले. सातारा जिल्हा खादी ग्रामोद्योग संस्थेचेहीचे ते अध्यक्ष राहिले. काँग्रेसचे प्रांतिक सदस्य म्हणून अनेक वर्षे काम केले. आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.

Web Title: A senior Congress leader Hindurao Patil will also give up his 'hands'! Former Agriculture Chairman of Zilla Parishad is at the mercy of 'BJP'