शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लाडेगावचे सरपंच राजू पाटील यांचा महिलांनी केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

वशी : गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन वर्गणी स्वरूपात रक्कम गोळा करून सरपंचांचा सपत्निक सत्कार करण्याचा अनोखा कार्यक्रम ...

वशी : गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन वर्गणी स्वरूपात रक्कम गोळा करून सरपंचांचा सपत्निक सत्कार करण्याचा अनोखा कार्यक्रम लाडेगाव येथे पार पडला.

लाडेगाव (ता. वाळवा) येथील लोकनियुक्त सरपंच रणधीर ऊर्फ राजू पाटील हे राजकारणाशी कोणताही संबंध नसताना शालेय जीवनापासूनच गावाची सेवा करत आहेत. मित्रांचे संघटन करून पाटील यांनी गावातील पिण्याच्या पाण्याचे आड व विहिरी स्वच्छ करून सुशोभिकरण करणे, गावाच्या रस्त्यांच्या कडेला शोभेची झाडे लावणे, संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करणे यासारखी कामे केली आहेत. लोकसहभागातून गावाबाहेरील ओढ्यातील घाण काढून ओढ्याचे रुंदीकरण करून बंधारे बांधले. यामुळे चार वर्षांपासून गावातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत.

याचेच फलित म्हणून २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावकऱ्यांनी राजू पाटील यांच्या गळ्यात लोकनियुक्त सरपंच पदाची माळ घातली. गावात आतापर्यंत १५ कोटीची कामे पूर्ण केली आहेत. गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे.

त्यांच्या सत्कारासाठी गावातील वैशाली पाटील, संगीता दाईंगडे, नम्रता पाटील, अनिता पाटील, जयश्री दाईंगडे, ग्रामपंचायत सदस्या धनश्री पाटील, वैशाली पाटील, मनीषा जाधव, पूनम मदने, अनुराधा पाटील यांनी पुढाकार घेतला होता.

फोटो - ०१०२२०२१-आयएसएलएम- वशी न्यूज

: लाडेगाव येथील सरपंच राजू पाटील यांचा ग्रामस्थांनी सपत्निक सत्कार केला.