शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेविकेकडून वायरमनला थप्पड

By admin | Updated: November 22, 2014 00:00 IST

तोंडोलीत घटना : वीज तोडण्याचा वाद

तोंडोली : तोंडोली (ता. कडेगाव) येथील आरोग्य सेविकेने वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या वायरमनच्या श्रीमुखात भडकावल्यामुळे तोंडोली गावात चांगलेच वातावरण तापले आहे.तोंडोली येथील आरोग्य केंद्राचे १३00 रुपये वीज बिल थकित असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वायरमनने गुरुवार दि. २0 नोव्हेंबर रोजी आरोग्य केंद्राचे वीज कनेक्शन तोडले. याचा राग मनात धरुन या आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकेने या वायरमनच्या श्रीमुखात लगावून त्याला चांगलीच मारहाण केली. या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली होती.वीज वितरण कंपनीचा हा वायरमन कडेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेला होता. परंतु गावातील काही लोक व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पोलीस स्टेशनच्या बाहेरच मिटविले. वायरमनला ‘तू बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला आहेस. पुढे पोलिस केस झाली तर तुला इकडे हेलपाटे मारावे लागतील’, असे सांगून या प्रकरणावर पोलीस स्टेशनच्या बाहेरच पडदा टाकण्यात आला. आरोग्य सेविकेनेही माफीनामा दिला. (वार्ताहर)माफीनाम्याने पडदागेली अनेक वर्षे ही आरोग्य सेविका गावात ठाण मांडून आहे. या आरोग्य सेविकेविषयी गावातील अनेक लोकांच्या तक्रारी असून, तिच्या बदलीविषयी ग्रामसभेत ठरावही घेण्यात आला होता. आलेल्या रुग्णांना या आरोग्य केंद्रात चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळत नसल्याचेही अनेक ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. या आरोग्य सेविकेने झालेल्या प्रकाराबद्दल कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये माफीनामा लिहून दिला आहे.