शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

सांगली- उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, भाजपाचे मंत्री चंद्रकातदादा पाटील एकाच व्यासपीठावर होते. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात विरोधकांना राजकीय टोले लगावले. 

यावेळी आमदार जयंत पाटील यांनी पक्षांत्तरावरुन राजकीय टोले लगावले. 'हा तालुका झुकणार नाही, भूमिका बदलणार नाही, हेच वाळवा तालुक्याचे वैशिष्ट्य आहे, सहजा सहजी वाकत नाही, घाबरून जात नाही. कितीही फंदफितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने राहतात, असंही पाटील म्हणाले.

दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

स्वातंत्र्य सैनिकांनी स्वाभिमानाने रहायला शिकवलं

"मला वाटतं हा तालुका एन. डी. पाटलांची जी प्रवृत्ती होती, जी पर्सनॅलिटी होती, ती वाळवा तालुक्याचा एकंदर स्वभाव काय आहे हीच सांगणारी होती. मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे, या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले आहेत, नागनाथ अण्णा नायकवडी, पांडू मास्तर, बाबूजी पाटणकर देखील याच तालुक्याचे आहेत, अशी असंख्य यादी मोठी आहे. ज्यांनी संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही. या वाळवा तालुक्याचे हेच सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे, कदाचित भारतातील सगळ्या तालुक्यांपेक्षा जास्त वाळवा तालुका वेगळा आहे असे मी मानतो, असंही पाटील म्हणाले.

"तुम्हाला असा तालुका सापडणार नाही. यांच्यात लढाईची प्रवृत्ती आहे. ही लढाई शेवटच्या निकरापर्यंत करायची हे एनडी पाटलांनी दाखवून दिलं, हा या तालुक्याचा आदर्श आहे. म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रोब्लेम पण आहे, सहजासहजी वाकत नाही, सहजा सहजी शरण जात नाही. लढाई करायची असेल तर ती कितीही फंदफितुरी झाली तरी जे आहेत त्यांना सोबत घेऊन लढायचे. हे एनडी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हा सगळ्यांना शिकवले आहे. हा आमचा स्वाभिमान आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र