शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीबाजाराची समस्या कायम

By admin | Updated: May 25, 2015 00:18 IST

मिरजेत रस्त्यावरील प्रकार : पर्यायी मंडईअभावी विक्रेते रस्त्यावरच

मिरज : मिरजेत रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांची कायमस्वरूपी भाजीमंडईची मागणी तीन दशके प्रलंबित असल्याने विक्रेत्यांनी रस्त्यांवरच ठाण मांडले आहे. रस्त्यांवरील विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून, विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी उपाययोजना नसल्याने ही समस्या अधिकाधिक गुंतागुंतीची बनली आहे.मिरजेची संस्थानकालीन भाजीमंडई अपुरी असल्याने विक्रेत्यांनी मार्केट परिसरातील रस्ते व्यापले आहेत. मार्केट परिसरात अरूंद रस्त्यावर विक्रेते, हातगाडी चालकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. लोणी बाजार परिसरात रस्त्यावरील विक्रेत्यांना न्यायालयाने मनाई केली आहे; मात्र मनाई आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर भाजीबाजार सुरूच आहे. कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था नसल्याने शेकडोवेळा हटविलेला भाजीबाजार पुन्हा रस्त्यावरच आहे. भाजीविक्रेत्यांसाठी बाजार समितीच्या आवारात पर्यायी भाजीबाजाराची व्यवस्था व शहरात आठ ठिकाणी आठवडा बाजाराची व्यवस्था करण्यात आली. पर्यायी भाजी बाजार व आठवडा बाजार सुरू आहेत, मात्र मार्केट, लोणी बाजार, दत्त चौक परिसरात रस्त्यावरील बाजाराची समस्या कायम आहे. भाजी मंडईसाठी पालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर भाजीमंडई बांधण्यास विक्रेत्यांचा विरोध आहे. खंदकात भाजीमंडईची विक्रेत्यांची मागणी आहे. खंदकाच्या खासगी जागेच्या भूसंपादनासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले. मात्र गेल्या दहा वर्षांत खंदकाच्या जागेच्या भूसंपादनाचे सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत. रस्त्यावरील भाजीबाजाराचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याने न्यायालयाने महापालिका व पोलिसांना अवैध भाजीबाजार हटविण्याचे आदेश दिले आहेत, मात्र त्यानंतरही महापालिकेने बाजार हटविण्यासाठी किरकोळ व जुजबी कारवाई केली आहे. भाजीबाजाराचा वाद न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येते. काही काळानंतर भाजीविक्रेते पुन्हा मूळ ठिकाणी येतात. हे आता सर्वांनाच सवयीचे झाले आहे. कायमस्वरुपी भाजी मंडईची व्यवस्था केल्याशिवाय हा प्रश्न सुटणे कठीण आहे. मात्र त्याऐवजी वरवरचे उपाय सुरू आहेत. खंदकाच्या जागेत नवीन भाजीमंडईची उभारणी प्रलंबित असल्याने रस्त्यावरील भाजीविके्रत्यांची समस्या गुंतागुंतीची झाली आहे. (वार्ताहर)आक्रमक विक्रेतेभाजीबाजार हटविण्यास जाणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात येतात. भाजी विक्रेत्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाही चोप दिला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना हटविण्याबाबत महापालिका व पोलिसांकडून परस्परावर जबाबदारी ढकलण्यात येत आहे. भाजीबाजार हटविल्याच्या कारणावरून विक्रेत्यांनी तत्कालीन नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कार्यालयात घुसून चोप दिला होता. न्यायालयाने भाजीबाजाराविरुध्द आदेश दिल्यानंतर न्यायालयात गेलेल्या काही व्यापाऱ्यांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती.