वसंतदादा बँकेची सुनावणी ३० रोजी

By Admin | Updated: November 25, 2015 00:46 IST2015-11-24T00:04:54+5:302015-11-25T00:46:30+5:30

१७० कोटींचा घोटाळा : निर्णय गुलदस्त्यात

Vasantdada Bank hearings on 30th | वसंतदादा बँकेची सुनावणी ३० रोजी

वसंतदादा बँकेची सुनावणी ३० रोजी

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या चौकशी अधिकाऱ्यांनी पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. यासंदर्भात दोघा अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सहकार विभागात गत आठवड्यात सुनावणी झाली असली तरी, सहकार विभागाचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दोन तत्कालीन अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्या निर्णयांविरोधात सहकार विभागाकडे अपील केले होते. कागदपत्रांच्या प्रती विकत देण्याच्या मुद्द्यावर हे अपील होते. त्यामुळे सहकार विभागाने याप्रकरणी दोघा अधिकाऱ्यांपुरती चौकशीला स्थगिती दिली होती. घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यातील काही संचालकांनी, अधिकाऱ्यांनी म्हणणे सादर केले आहे. आणखी काहींचे म्हणणे अद्याप सादर होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vasantdada Bank hearings on 30th