Sangli Crime: आष्ट्यात नशेचे इंजेक्शन विक्री करणारे दोघे जेरबंद, ७४ इंजेक्शन जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 17:55 IST2026-05-11T17:55:11+5:302026-05-11T17:55:36+5:30

सांगली/ आष्टा : आष्टा परिसरात ऑनलाईन ॲपवरून नशेचे इंजेक्शन मागवून त्याची विक्री करणाऱ्या अभिषेक भीमराव सरवदे (वय २६, रा. ...

Two arrested for selling intoxicating injections in Ashta Sangli 74 injections seized | Sangli Crime: आष्ट्यात नशेचे इंजेक्शन विक्री करणारे दोघे जेरबंद, ७४ इंजेक्शन जप्त 

Sangli Crime: आष्ट्यात नशेचे इंजेक्शन विक्री करणारे दोघे जेरबंद, ७४ इंजेक्शन जप्त 

सांगली/ आष्टा : आष्टा परिसरात ऑनलाईन ॲपवरून नशेचे इंजेक्शन मागवून त्याची विक्री करणाऱ्या अभिषेक भीमराव सरवदे (वय २६, रा. शिराळकर कॉलनी, दूधगाव रस्ता, आष्टा) आणि रेहान रफीक मुजावर (२०, रा. गोर्डे चौक, आष्टा) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दोघांकडून २६ हजार ७६६ रुपयांची ट्रेमीमाईड नावाचे ७४ इंजेक्शन दुचाकी हस्तगत केली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यातील वाढत्या नशेखोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सूचना दिल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांनी कारवाईसाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. पोलिस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील कर्मचारी संजय पाटील आणि अभिजित ठाणेकर यांना आष्टा हद्दीतील घाटगे मळा परिसरातील श्रीराम नाष्टा सेंटर समोर दोघेजण दुचाकीवरून नशेची इंजेक्शन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी परिसरात सापळा लावला.

काही वेळाने दुचाकीवरून दोघेजण येऊन थांबले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली असता कापडी पिशवीत ट्रेमीमाईड इंजेक्शनच्या ७८ बाटल्या आढळून आल्या. इंजेक्शन विक्री करण्याचा परवाना दोघांकडेही नव्हता. पोलिस चौकशीत इंजेक्शनच्या बाटल्या संशयितांनी ऑनलाईन ॲपवरून मागविल्याचे निष्पन्न झाले.

या इंजेक्शनचा वापर प्रामुख्याने युवक नशेसाठी करीत असल्याने त्याची जादा दराने विक्री करण्यासाठीच ती मागविली असल्याची कबुली दोघांनी दिली. दोघा संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली एक लाखाची दुचाकी, तसेच २६ हजार ७६६ रुपयांची इंजेक्शन असा मुद्देमाल जप्त केला. संशयितांवर औषधीद्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधने अधिनिमन्वये दोघांविरुद्ध आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनंतर कारवाई

आमदार जयंत पाटील आणि आष्ट्याचे नगराध्यक्ष विशाल शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, उपनगराध्यक्ष दिलीप वग्याणी, दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, विराज शिंदे, आदींनी पोलिस अधीक्षक दोशी यांना आष्ट्यातील नशेखोरीविरोधात निवेदन दिले होते. त्यानंतर पोलिसांनी आष्टा येथे लक्ष केंद्रित करून कारवाई केली.

Web Title : सांगली: आष्टा में नशीले इंजेक्शन बेचने वाले दो गिरफ्तार।

Web Summary : सांगली के आष्टा में ऑनलाइन नशीले इंजेक्शन बेचने के आरोप में दो लोगों को गिरफ्तार किया गया। पुलिस ने ₹26,766 मूल्य के 74 इंजेक्शन और एक मोटरसाइकिल जब्त की। यह गिरफ्तारी क्षेत्र में बढ़ते नशीली दवाओं के उपयोग की शिकायतों के बाद की गई।

Web Title : Sangli: Two arrested in Ashta for selling drug injections.

Web Summary : Two individuals were arrested in Ashta, Sangli, for selling narcotic injections online. Police seized 74 injections worth ₹26,766 and a motorcycle. The arrests followed complaints about rising drug use in the area.