शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

देवनगरला बस उलटून पस्तीस विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:52 IST

विटा : विट्याहून वाळूजकडे अरूंद रस्त्याने निघालेल्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस नाल्यात उलटून ३५ शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी ...

विटा : विट्याहून वाळूजकडे अरूंद रस्त्याने निघालेल्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस नाल्यात उलटून ३५ शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास देवनगर (ता. खानापूर) गावाजवळ सांगोले रस्त्यावर घडली.दरम्यान, बस उलटलेल्या ठिकाणापासून पुढे केवळ दहा फुटावर खोल विहीर होती. बस आणखी काही अंतर पुढे गेली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. याप्रकरणी संतप्त पालकांनी बसचालक तुकाराम शिंदे यांच्याविरुध्द बुधवारी रात्री उशिरा विटा पोलिसांत फिर्याद दिली.खानापूर तालुक्यातील भांबर्डे व देवनगर येथील शालेय विद्यार्थी वाळूज विद्यालयात शिक्षण घेतात. बुधवारी सकाळी ९.३० वाजता विटा आगाराची विटा ते वाळूज ही बस (क्र. एमएच १२ सीएच ७५८३) आगारातून वाळूजकडे निघाली होती. सकाळी पावणेदहा वाजता भांबर्डे व देवनगर येथील ४१ विद्यार्थी घेऊन बस सांगोलेमार्गे वाळूजकडे जात होती. बस देवनगर गावाजवळच वळणावर असलेल्या अरूंद रस्त्यावर असताना समोरून येणाऱ्या टेम्पोला बाजू देण्याच्या प्रयत्नात चालक तुकाराम शिंदे यांचा बसवरील ताबा सुटला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाच फूट खोल नाल्यात उलटली. त्यावेळी बसमध्ये ४१ शालेय विद्यार्थी होते. बस वाहकाच्या बाजूला नाल्यात उलटल्याने चालकाच्या पाठीमागे बसलेले सर्व विद्यार्थी वाहकाच्या बाजूला असलेल्या मुलांच्या अंगावर पडले. प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने तात्काळ मुलांना बसमधून बाहेर काढले.घटनेची माहिती मिळताच युवा नेते सुशांत देवकर, सरपंच सचिन शेंडे व मुख्याध्यापक विजयसिंह गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मुलांना उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दुपारी आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली होती. उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.रुंदीकरण करणार...दरम्यान, देवनगर येथे असलेला अरूंद रस्ता रूंदीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्याची पाहणी केली आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले.अरूंद रस्त्यामुळे अपघातदेवनगर ते सांगोले हा रस्ता अत्यंत अरूंद आहे. गेल्या चार वर्षांपूर्वीही याचठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी रस्ता रूंदीकरणाची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा अपघात झाला असल्याची प्रतिक्रिया सांगोलेचे माजी सरपंच सुशांत देवकर यांनी व्यक्त केली.