शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंत पंचायत’मध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

फोटो ओळ : मिरज पंचायत समितीच्या बैठकीस सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, ...

फोटो ओळ : मिरज पंचायत समितीच्या बैठकीस सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, अशोक नांगर, कृष्णात लोहार, आदी उपस्थित होते.

मिरज : यशवंत पंचायत राज अभियानात यशस्वी होण्यासाठी मिरज पंचायत समितीच्या विभागप्रमुखांनी अपूर्ण कामकाज तत्कळ पूर्ण करावीत, अशी सूचना सभापती त्रिशला खवाटे व उपसभापती अनिल आमटवणे यांनी आढावा बैठकीत दिली.

मिरज पंचायत समिती यशवंत पंचायत राज अभियानात सहभाग घेणार आहे. यामध्ये यशस्वी होण्यासाठी मिरज पंचायत समितीने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे व गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत मिरज पंचायत समितीच्या विभागप्रमुखांची आढावा बैठक पार पडली.

विभागप्रमुखांच्या कामकाजाचा गटविकास अधिकारी सरगर यांनी आढावा घेतला. अपूर्ण कामकाज असणाऱ्या विभागप्रमुखांना कामे पूर्ण करण्याची सूचना देताना यशवंत पंचायत राजमध्ये यशस्वी होण्यासाठी अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत याची माहिती गटविकास अधिकारी सरगर यांनी दिली.

यावेळी सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे यांनीही विभागप्रमुखांना मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांचा पंचायत राजमध्ये मिरज पंचायत समिती यशस्वी होण्यासाठी प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चौकट

प्रथम येण्यासाठी प्रयत्न करा

मागील वर्षीच्या गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करणे आवश्यक आहे. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून यशवंत पंचायत राजमध्ये मिरज पंचायत समिती राज्यात प्रथम यावी यासाठी विभागप्रमुखांनी जिद्दीने कामकाजाचे नियोजन करण्याची सूचना सभापती त्रिशला खवाटे व उपसभापती अनिल आमटवणे यांनी केली.