शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
3
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
4
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
5
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
6
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
7
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
8
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
9
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
10
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
11
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
12
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
13
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
14
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
15
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
16
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
17
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
18
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
19
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
20
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरी बस सेवेला प्रवाशांचा ठेंगा

By admin | Updated: December 2, 2014 23:33 IST

एसटीला आर्थिक फटका : प्रवाशांच्या संख्येत घट; अडचणीतील महामंडळासमोर चिंता

सदानंद औंधे - मिरज -सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असलेल्या महापालिका क्षेत्रातील शहरी बस सेवेचा तोटा वाढत असून सांगली व मिरज या दोन्ही आगारांना दरमहा दहा लाखांचा तोटा होत आहे. ८० बसेसद्वारे दरमहा सुमारे पाच लाख किलोमीटर अंतराच्या फेऱ्या करणाऱ्या प्रत्येक शहरी बसेसची दररोजची सरासरी प्रवासी संख्या ३२० एवढीच आहे.
सांगली-मिरज शहरापासून २० कि.मी. अंतरापर्यंत शहरी बससेवा देणाऱ्या एसटीचे प्रवासी कमी होत असल्याने तोट्यातही वाढ होत आहे. मिरज आगाराच्या ४० व सांगली आगाराच्या ४० अशा ८० बसेस दररोज पहाटे पाचपासून रात्री ११ पर्यंत शहरी बससेवा करतात. शहरी बससेवेमुळे शहरातील व शहरालगत असलेल्या २४ गावांतील प्रवाशांची सोय झाली आहे. पण प्रवाशांनी पाठ फिरविल्याने गेल्या दहा वर्षात शहरी बस सेवेच्या तोट्यात वाढ होत आहे. मिरज व सांगली आगाराच्या शहरी बसेस दररोज पंधरा ते सोळा हजार कि.मी. फेऱ्या करतात.
शहराचा विस्तार, लोकसंख्या व प्रवासी संख्या वाढल्यानंतरही शहरी बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. सांगली व मिरज आगारातील शहरी बसेसच्या प्रवाशांची सरासरी संख्या दरमहा २५ ते २६ हजार आहे. ही संख्या प्रतिबस ३२० एवढीच असल्याने दोन्ही आगारांना कोट्यवधीचा वार्षिक तोटा होत आहे. अवैध प्रवासी वाहतूक, परवानाधारक प्रवासी वाहतूकदारांच्या व दुचाकी वाहनधारकांच्या संख्येत वाढ, अनियमित बसफेऱ्या, बसेसची दुरवस्था अशा विविध कारणांमुळे शहरी बसेसचे प्रवासी कमी होत आहेत. तोट्यात असल्यामुळे शहरी बसेसच्या ताफ्यात एकही नवीन बस आली नसल्याचे सांगितले.


महापालिकेचा नकार
शहरी बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी यासाठी एसटीचे प्रयत्न आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याच्या कारणावरून महापालिकेने तोट्यातील शहरी बससेवा चालविण्यास नकार दिल्याने तोट्याचा भार एसटी सहन करीत आहे.
तुलनेने संख्या कमी
शहरी बससेवा फायद्यात येण्यासाठी सध्याची सरासरी प्रवासी संख्या दुप्पट होणे आवश्यक आहे. एका वडाप रिक्षातून दररोज दिवसभरात ८० ते ९० प्रवाशांची वाहतूक होते. या तुलनेत शहरी बसेसची प्रवासी संख्या अत्यंत कमी आहे.