शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: प्रशासनाला दिलासा, पंचायत राज समितीचा दौरा या वर्षीदेखील नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:15 IST

२०१८ पासून दौरा नाही, सध्या अतिवृष्टी आणि निवडणुकांचे कारण 

सांगली : यंदाच्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टी आणि आगामी निवडणुकांची आचारसंहिता यामुळे या वर्षीही पंचायत राज समिती येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. किंबहुना विधिमंडळाच्या सर्वच समित्यांनी दौरे रद्द करावेत, असे आदेश सचिवालयाने काढल्यानेही या वर्षी पंचायत राज समिती येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.समिती येणार नसल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये समिती सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यानंतर काही ना काही कारणांनी तिचा दौरा लांबत गेला. कोरोनाकाळात ती आलीच नाही. २०२२ पासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज आहे. या कालावधीतही समिती या ना त्या कारणांनी लांबत गेली. २०२५ मध्ये ती येण्याची शक्यता होती, पण गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे विधिमंडळ समित्यांनी कोणतेही दौरे काढू नयेत, असे फर्मान सचिवालयाने काढले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणारे विधिमंडळ समित्यांचे दौरे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आले आहेत असे आदेशात म्हटले आहे. समित्यांचे दौरे सुरू झाले असते, तर त्यांच्या तयारीत प्रशासन मोठ्या प्रमाणावर अडकून पडले असते. त्याचा प्रतिकूल परिणाम शेतकरी व पूरग्रस्त नागरिकांच्या मदतकार्यावर झाला असता. त्यामुळे समित्यांचे दौरे रद्द करून प्रशासनावरचा ताण कमी करण्याचा निर्णय सचिवालयाने घेतला.

सध्या पाऊस थांबला असला, तरी निवडणुकांचा हंगामा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगर पंचायती, नगर परिषदा, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा मुहूर्त लागू शकतो. सध्या प्रशासन या निवडणुकांच्या तयारीत आहेत. आगामी चार-पाच महिने अधिकारी, कर्मचारी यातच अडकून पडणार आहेत. त्यामुळेही यावर्षी पंचायत राज समिती येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यावर्षी धाकधूक नाहीपंचायतराज समिती दौऱ्यावर येणार असते, त्या वेळी महिना-दोन महिन्यापासून जिल्हा परिषदेला तयारी करावी लागते. विभागनिहाय प्रलंबित फायलिंगसह विविध अपूर्ण कामांचा निपटारा करण्याकडे कल असतो. समितीकडून उपस्थितीत होणाऱ्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने अद्ययावत माहिती तयार करावी लागते. समिती येणार म्हटल्यावर सर्वांचीच धांदल उडते. सध्या मात्र यातून सुटका मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Panchayat Raj Committee Visit Cancelled Again, Relief for Administration

Web Summary : Sangli administration breathes easy as Panchayat Raj Committee visit is cancelled due to heavy rains and upcoming elections. The secretariat has cancelled all committee visits, relieving pressure on administration focused on flood relief and election preparations.