शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: राजकीय आखाड्यात आयाराम-गयारामांची गर्दी; गावोगावी पक्षप्रवेशाचे सोहळे, तिकिटासाठी डावपेच सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:54 IST

तिसऱ्या आघाडीचा पर्याय

संतोष भिसेसांगली : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागताच विविध पक्षांत आयाराम-गयारामांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणच्या सर्रास राजकीय कार्यक्रमांत पक्षप्रवेशाचे सोहळे रंगत आहेत. निवडणुका स्वतंत्र लढणार की महायुतीमहाविकास आघाडी म्हणून अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही प्रमुख राजकीय पक्षांत प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवार निश्चित झाले आहेत. महिला आरक्षण असेल, तेथे नेतेमंडळींनी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. तब्बल आठ वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे. साहजिकच सर्वच पक्षांच्या नेत्यांना तिकीट वाटपावेळी मोठ्या कसरतीला तोंड द्यावे लागणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, मुंबई महापालिका वगळता अन्यत्र निवडणुका स्वतंत्र लढल्या जातील. गरजेनुसार त्या-त्या ठिकाणी निवडणूकपूर्व युती केली जाईल. निवडणुकीनंतर सत्तेसाठी हातमिळवणी केली जाईल. फडणवीस यांच्या वक्तव्याची अंमलबजावणी झाली, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या जाणार नाहीत हे स्पष्ट आहे. स्वाभाविकच इच्छुकांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, रिपाइं अशा वेगवेगळ्या पक्षांतून संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना यंदा तिकिटे मिळण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीतून एकत्र किंवा स्वतंत्र लढतीबाबत वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्या जात असल्याने स्थानिक स्तरावरील इच्छुक संभ्रमात आहेत. त्यांनी स्वत:च्या ताकदीवर लढण्याची तयारी सुरू केली आहे. चांगले मतदान मिळविण्यासाठी एखाद्या पक्षाचे पाठबळ मिळाले, तर त्याचा फायदा होतो हे लक्षात घेऊन पक्षीय वळचणीला जाण्याचे सर्वच इच्छुकांचे प्रयत्न आहेत; पण पक्षांच्या भूमिका निश्चित होत नसल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.

तिसऱ्या आघाडीचा पर्यायमहायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या भूमिका निश्चित होत नसतानाच माजी खासदार संजय पाटील यांनी तिसऱ्या आघाडीतून जिल्हा परिषद व पंचायत समित्या लढविण्याची तयारी सुरू केली आहे. भाजप किंवा अन्य कोणत्याच पक्षात पाठबळ नसलेल्या उमेदवारांकडून या आघाडीचा विचार सुरू आहे.

कार्यकर्ते वेटिंगमध्ये..?जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षांतरे जोरात सुरू झाली आहेत. भाजपमध्ये तर आम्हाला पक्षप्रवेश देता का ? अशी विचारणाऱ्यांची रांग लागल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यातून पक्षात अस्वस्थतेचे वातावरणही आहे. पक्षामध्ये स्थानिक स्तरावर विविध गटही तयार झाले आहेत. याचे फायदे-तोटे प्रत्यक्ष निवडणुकीत दिसणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Politics: Party Hopping Heats Up as Elections Approach

Web Summary : Sangli's political arena sees increased party switching ahead of local elections. Uncertainty surrounds alliances, prompting individual preparations. A third front emerges for unaligned candidates, creating internal unease within parties.