शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Mayor: महायुतीचे ठरले... महापौर भाजपचा, तर उपमहापौर राष्ट्रवादीचा; शिंदेसेनेचा सत्तेतील सहभाग अनिश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:03 IST

अजित पवार यांच्या निधनानंतर युतीबाबतची गणिते बदलली 

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या असून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष युतीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तर शिंदेसेनेच्या सत्तेतील सहभागाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. महायुतीच्या वतीने महापौरपद भाजपकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे संकेत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या, मंगळवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ जिल्हा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते भाजप पदाधिकाऱ्यांची महापौरपदासह राष्ट्रवादीच्या युतीबाबत चर्चा करण्याची शक्यताही आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ३९ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे १६, शिंदेसेनेचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याशी संपर्क साधला होता. भाजप-शिंदेसेना युतीचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून घेण्याचा निर्णय झाला. भाजपमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पाठिंबा घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या दोन नगरसेवकांशीही संपर्क साधला होता; पण अजित पवार यांच्या निधनानंतर युतीबाबतची गणिते बदलली आहेत. 

भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची युती जवळपास निश्चित आहे. विमान अपघातापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी मुंबईत चर्चाही केली होती. त्यांच्या निधनानंतर आता भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे संख्याबळ ५५ वर पोहोचले आहे. शिंदेसेनेच्या पाठिंब्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यांच्या दोन्ही नगरसेवकांशीही भाजप नेत्यांनी चर्चा केलेली नाही. त्यामुळे शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपकडून सत्ता स्थापन केली जाऊ शकते.

महापौर व उपमहापौरपदाबाबतही दोन्ही पक्षांत समझोता झाला आहे. भाजपचा महापौर, तर राष्ट्रवादीचा उपमहापौर होणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीनेही तयारी सुरू केली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या उपस्थितीत झाली. उद्या, मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी ते भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीला पाच वर्षे उपमहापौर, दोन वर्षे स्थायी सभापती

विमान अपघातापूर्वी आदल्या दिवशी अजित पवार यांनी महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी मुंबईत मंत्रालयात चर्चा केली होती. या चर्चेत राष्ट्रवादीला पाच वर्षे उपमहापौरपद व दोन वर्षे स्थायी समिती सभापती पद देण्याचा फाॅर्म्युला निश्चित झाला होता. तिसऱ्या व चौथ्या वर्षी राष्ट्रवादीला स्थायी सभापतीपद देण्याचा निर्णय झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने केला. आता या चर्चेनुसार पालकमंत्री पाटील हे घोषणा करतील, असेही राष्ट्रवादीतून सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Mayor: BJP, NCP alliance; Shinde Sena's role uncertain.

Web Summary : Sangli's mayoral election sees a BJP-NCP alliance, leaving Shinde Sena's participation unclear. BJP will likely secure the Mayor position, with NCP taking Deputy Mayor. Discussions are planned during Minister Patil's district visit.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस