Sangli: मालवाहतूक टेम्पो-कारची समोरासमोर भीषण धडक, अपघातात इचलकरंजीतील तरुण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:45 PM2024-01-06T13:45:01+5:302024-01-06T13:45:53+5:30

तासगाव : तासगाव-विटा मार्गावर पानमळेवाडी (ता. तासगाव) हद्दीत शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माेटार (क्र. एमएच ०२ बीजी १०२७) ...

tempo-car collides head-on in Sangli, youth from Ichalkaranji killed in accident | Sangli: मालवाहतूक टेम्पो-कारची समोरासमोर भीषण धडक, अपघातात इचलकरंजीतील तरुण ठार

Sangli: मालवाहतूक टेम्पो-कारची समोरासमोर भीषण धडक, अपघातात इचलकरंजीतील तरुण ठार

तासगाव : तासगाव-विटा मार्गावर पानमळेवाडी (ता. तासगाव) हद्दीत शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माेटार (क्र. एमएच ०२ बीजी १०२७) आणि मालवाहतूक टेम्पो (क्र. एमएच १४ केक्यू ४३६६) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघातात लग्नासाठी बारामतीस निघालेले इचलकरंजी येथील हरीश लक्ष्मण उरुणकर (वय ४३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी, दोन मुले आणि चालक जखमी झाले. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

इचलकरंजी येथील हरीश लक्ष्मण उरुणकर हे कुटुंबीयांसह बारामतीला लग्नासाठी निघाले होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तासगाव ते विटा मार्गावर पानमळेवाडीनजीक घाटकोपरहून द्राक्षांचे कॅरेट घेऊन खंडेराजुरीच्या दिशेने छोटा टेम्पो भरधाव येत होता.
चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत चालकाशेजारी बसलेल्या उरूनकर यांचा जागीच मृत्यू झाला.

तर चालक आणि उरूनकर यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: tempo-car collides head-on in Sangli, youth from Ichalkaranji killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.