Tata Punch EV ते Nexon EV पर्यंत... 'या' 3 इलेक्ट्रिक कारवर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 04:14 PM2024-06-11T16:14:25+5:302024-06-11T16:15:13+5:30

या महिन्यात कंपनीच्या Nexon EV, Punch EV आणि Tiago EV वर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

tata punch ev nexon ev electric car discount offers june 2024 price range specs features | Tata Punch EV ते Nexon EV पर्यंत... 'या' 3 इलेक्ट्रिक कारवर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट!

Tata Punch EV ते Nexon EV पर्यंत... 'या' 3 इलेक्ट्रिक कारवर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट!

नवी दिल्ली : सध्या देशातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. भारतात टाटा मोटर्स ही सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी आहे. टाटाच्या बॅटरीवर चालणाऱ्या कार टिकाऊपणाच्या बाबतीतही खूप चांगल्या आहेत. कार क्रॅश टेस्ट रँकिंगमध्ये टाटाच्या कारला चांगले सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, ग्राहकांनी जून २०२४ मध्ये टाटा ईव्ही खरेदी केल्यास मोठी बचत होऊ शकते. या महिन्यात कंपनीच्या Nexon EV, Punch EV आणि Tiago EV वर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

टाटा मोटर्स या महिन्यात आपल्या इलेक्ट्रिक कार रेंजवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ग्राहक एक्सचेंज बेनिफिट्स, कॉर्पोरेट ऑफर आणि ग्रीन बोनस अंतर्गत मोठ्या सवलतींचा लाभ घेऊ शकतात. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांना ग्रीन बोनस मिळत आहे. जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर टाटा इलेक्ट्रिक कारवर उपलब्ध असलेल्या ऑफर नक्की पाहू शकता.

Tata Punch EV वर दहा हजार रुपयांपर्यंत सूट
तुम्ही जून २०२४ मध्ये Tata Punch EV खरेदी केल्यास तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. टाटाच्या इलेक्ट्रिक कारमध्ये सर्वात कमी सूट फक्त Punch EV वर मिळत आहे. Punch EV दोन बॅटरी पॅकसह येते. या कारचे २५ kWh युनिट एका चार्जमध्ये ३१५ किमी अंतर कव्हर करते, तर ३५ kWh बॅटरी पॅक ४२१ किमी पर्यंतची रेंज मिळते. Tata Punch EV ची एक्स-शोरूम किंमत १०.९९ लाख ते १५.४९ लाख रुपये आहे.

Tata Tiago EV वर ५,००० रुपयांपर्यंत सूट 
Tata Tiago EV 2023 मॉडेल्सवर ९५,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याचबरोबर, २०२४ चे लाँग रेंज मॉडेल ७५,००० रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय, तुम्हाला मिड-रेंज वेरिएंट्सच्या खरेदीवर ६०,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. Tata Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत ७.९९ लाख ते ११.८९ लाख रुपये आहे.

Tata Nexon EV वर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट
याचबरोबर, तुम्ही Tata Nexon EV चे २०२३ मॉडेल १.३५ लाख रुपयांपर्यंतच्या सूटवर खरेदी करू शकता. २०२४ मॉडेल Nexon EV वर ८५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Nexon EV ची एक्स-शोरूम किंमत १४.४९ लाख ते १९.४९ लाख रुपये आहे. ही ईव्ही ३०kWh बॅटरी पॅकवर ३२५ किमी आणि ४०.५ kWh बॅटरी पॅकवर ४६५ किमीची सिंगल चार्ज रेंज देते.
 

Web Title: tata punch ev nexon ev electric car discount offers june 2024 price range specs features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.