Nitanshi Goel : आईने सोडली सरकारी नोकरी, वडिलांनी बंद केला व्यवसाय; 'फूल कुमारी' अशी झाली स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 04:07 PM2024-06-11T16:07:30+5:302024-06-11T16:29:14+5:30

Nitanshi Goel : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'मध्ये 'फूल कुमारी'ची भूमिका साकारून नितांशी गोयल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'मध्ये 'फूल कुमारी'ची भूमिका साकारून नितांशी गोयल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. अभिनेत्रीच्या निरागसपणा आणि साधेपणामुळे चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

नितांशीने सांगितलं की, या चित्रपटानंतर तिचं आयुष्य खूप बदललं आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी तिची अकरावीची परीक्षा सुरू होती. मात्र चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने ती परीक्षा देऊ शकली नाही.

नितांशीने त्यानंतर अकरावीची परीक्षा दिली. अभिनेत्री आता बारावीत आहे. तिने कॉमर्स स्ट्रीमची निवड केली आहे, पण तिचं स्वप्न अभिनेत्री बनण्याचं आहे.

Ranveer Allahbadia ला दिलेल्या लेटेस्ट मुलाखतीत नितांशीने तिचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप त्याग केला असल्याचं सांगितलं आहे.

"माझ्या स्वप्नांसाठी आई-वडिलांनी त्यांचं काम देखील सोडलं. तुमच्यावर तुमच्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम कोणीच कधीच करू शकत नाही."

"माझे आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी खूप गोष्टींचा त्याग केला आहे. मला अभिनय करायचा होता, टीव्हीवर स्वत:ला पाहायचं होतं."

"मी हा विचार केल्यामुळेच माझ्या वडिलांनी नोएडामधील त्यांचा व्यवसाय सोडला. आता ते माझ्यासोबत इथे राहून जॉब करत आहेत."

"आईनेही माझ्यासाठी तिची सरकारी नोकरी सोडली. ती आता इथे माझ्यासोबत राहते. मला अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून दोघांनीही हे केलं. हेच खरे प्रेम असतं" असं नितांशीने म्हटलं आहे.

निताशीला विचारण्यात आलं की, चित्रपटानंतर तिला मुलांचं अटेन्शन मिळतं का? यावर ती म्हणाली की, - "माझी आई माझ्याकडे तक्रार करत होती की मी तुझे ईमेल वाचते, कारण तू स्वतः वाचत नाहीस."

"तुला ईमेलवर अनेक लव्हलेटर्स येत आहेत. अनेक महिलांना आता फुल कुमारीसारखी सून हवी असल्याचे व्हिडीओ शेअर होत आहेत. मी या सगळ्याचा आनंद घेत आहे."

नितांशी सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत. तिच्या अदांवर ते फिदा होतात.