शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तेजश्री बोंडे यांचा उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा तेजश्री अनिल बोंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याकडे दिला. पुढील संधी ...

आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा तेजश्री अनिल बोंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याकडे दिला. पुढील संधी शिंदे गटाला मिळणार असल्याने या गटाचे शेरनवाब देवळे, धैर्यशील शिंदे व प्रतिभा पेटारे यांच्या नावांची चर्चा आहे.

आष्टा पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची संधी जलसंपदामंत्री जयंत पाटील गटाला दुसऱ्या व चौथ्या वर्षी देण्यात येते. चौथ्यावर्षी मनीषा जाधव यांच्यानंतर तेजश्री बोंडे यांना संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाल जानेवारीअखेर संपला. त्यामुळे बोंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

तेजश्री यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व श्रेष्ठी दिलीप वग्यानी, बबन थोटे, विराज शिंदे, रघुनाथ जाधव, संग्राम फडतरे, व्ही. डी. पाटील यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. शहरातील नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असून, भविष्यातही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालिका अधिकारी आनंदा कांबळे, प्रतिभा पेटारे, वीर कुदळे, अनिल बोंडे, सारिका मदने ,सुदर्शन वाडकर उपस्थित होते.

फोटो: ०१०२२०२१-आयएसएलएम-आष्टा पालिका न्यूज

आष्टा पालिकेच्या उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आनंदा कांबळे, प्रतिभा पेटारे, सारिका मदने, वीर कुदळे, अनिल बोंडे उपस्थित होते.