शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव नगराध्यक्ष निवड २९ रोजी

By admin | Updated: September 18, 2015 23:33 IST

निवडणूक कार्यक्रम जाहीर : सुशिला साळुंखेंचे नाव आघाडीवर

तासगाव : तासगाव नगरपालिकेत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर नगराध्यक्ष संजय ऊर्फ अजय पवार यांनी राजीनामा दिला. नव्या नगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांनी नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २९ सप्टेंबरला नगराध्यक्ष निवड होणार आहे. पालिकेत भाजपचा पहिलाच नगराध्यक्ष होणार असल्याने उत्सुकता आहे. अद्याप नाव जाहीर झाले नसले तरी, सुशिला साळुंखे यांचे नाव आघाडीवर आहे.तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे एकमेव नगरसेवक संजय पवार यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. मात्र राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर पाच नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केली. खासदार संजयकाका पाटीलसमर्थक नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करत नगराध्यक्षांविरोधात १८ पैकी १६ जणांनी अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर तात्काळ नगराध्यक्ष पवार यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा राजीनामा मंजूर केला.नव्या नगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी बोरकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांनी नगराध्यक्षपदाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या सुशिला साळुंखे आणि रजनीगंधा लंगडे यांना उर्वरित कालावधित नगराध्यक्ष पदासाठी शब्द दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची संधी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या टर्मसाठी सुशिला साळुंखेंचे नाव आघाडीवर आहे. २९ सप्टेंबररोजी होणाऱ्या निवडणुकीकडे आता लक्ष लागले आहे. (वार्ताहर) नगराध्यक्ष निवडीचे सोपस्कार विद्यमान नगराध्यक्षांविरोधात सोळा नगरसेवकांनी एकत्रित येत अविश्वास ठराव दाखल केला होता. यापुढे पालिकेच्या राजकारणात विरोधी बाकावर दोनच नगरसेवक राहणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष निवड बिनविरोध होण्याची शक्यताच अधिक आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष होणार आहे. नगराध्यक्ष निवडीकडे आता तासगाव शहराचे लागून राहिले आहे.