शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या चर्चेला तुर्तास ब्रेक, अजितदादांच्या निधनामुळे आता स्थानिक नेतेच घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:35 IST

मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यात झाली होती चर्चा

सांगली : महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असून भाजपला शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सत्ता स्थापनेच्या निर्णय कोण घेणार? हा प्रश्न पडला आहे. निधनापूर्वी दोन दिवस मुंबईत सत्ता स्थापनेबाबत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. पण आता त्यांच्या जाण्याने या साऱ्या चर्चेला तुर्तास ब्रेक लागला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपला सर्वाधिक ३९ जागा मिळाल्या आहेत. त्यांना बहुमतासाठी एक जागेची गरज आहे. शिंदेसेनेचे २ नगरसेवक निवडून आल्याने भाजपने त्यांच्याशी चर्चा सुरू केली होती.

तर स्थायी समिती सभापतीपदाचे गणित जुळविण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीपैकी एकाचा पाठिंबा भाजपला आवश्यक आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष १६ तर शरद पवार पक्षाला ३ जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षालाच प्राधान्य होते. तसे संकेतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते.

चार दिवसांपूर्वी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी अजितदादांशी संपर्क साधून सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली होती. त्यावर पवार यांनी दोन दिवसांत कळवितो, असा निरोप दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यात चर्चाही झाली होती. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीने अडीच वर्षे उपमहापौरपद व दोन वर्षे स्थायी समिती सभापतीपदाची मागणी केली होती. येत्या दोन दिवसांत ही चर्चा अंतिम टप्प्यात येऊन युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण दरम्यान अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्याने या साऱ्या चर्चेला ब्रेक लागला आहे.

युती व गटनेत्याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार

महापालिकेच्या महापौरपदाची निवड १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर महापौरपदासाठी २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान अर्ज दाखल केले जाणार आहेत. यादरम्यान भाजप-राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या युतीचा निर्णय होणार का? याची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या गटनेता निवडही लांबणीवर गेली आहे. विभागीय आयुक्तांकडे गटनेता व गट नोंदणीही करावी लागणार आहे. भाजपशी युती व गटनेत्याचा निर्णय आता स्थानिक पातळीवरील नेत्यांनाच घ्यावा लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Corporation Alliance Talks Halted; Local Leaders to Decide After Pawar's Demise.

Web Summary : Sangli's political alliance hangs in balance after Ajit Pawar's death. Discussions paused; local leaders will decide BJP-NCP-Shinde Sena partnership for corporation control. Mayor election looms.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस