सुखवाडी, माळवाडी, तुपारी, सांडगेवाडी ग्रामपंचायतींची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:48+5:302021-02-05T07:24:48+5:30

ग्रामपंचायतमध्ये कारभार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, नियम डावलून कामे करण्याचा प्रकार जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये वाढले आहेत. ...

Sukhwadi, Malwadi, Tupari, Sandgewadi gram panchayats will be questioned | सुखवाडी, माळवाडी, तुपारी, सांडगेवाडी ग्रामपंचायतींची होणार चौकशी

सुखवाडी, माळवाडी, तुपारी, सांडगेवाडी ग्रामपंचायतींची होणार चौकशी

ग्रामपंचायतमध्ये कारभार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, नियम डावलून कामे करण्याचा प्रकार जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये वाढले आहेत. पलूस तालुक्यातील तुपारी, सुखवाडी, सांडगेवाडी व माळवाडी ग्रामपंचायतींमधील मनमानी कारभार आणि अनियमितेबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाली होती. अनुसूचित जाती व नवबौद्ध योजनेतील कामांबाबतही या गावातील सरपंचांची तक्रार झाली होती. ग्रामपंचायत सुखवाडी येथील पेव्हिंग ब्लॉक बसवणे, स्मशानभूमी सोई सुविधा पुरवणे यासारखी कामे कोणत्या ठेकेदारास द्यावीत, याबाबतचा उल्लेख शिफारस पत्रात सरपंचांनी केला आहे. सांडगेवाडी सरपंचांनी दलित वस्तीतील कामे कोणत्या ठेकेदारास द्यावे. तुपारी सरपंचांनी जनसुविधा योजनेतील काम कोणत्या ठेकेदारास द्यावे आणि माळवाडी सरपंचांनी नागरी सुविधा योजनेतील कामे कोणत्या ठेकेदारास देण्याचे शिफारस पत्र दिले आहे. सरपंचांनी दिलेले लेखी पत्र अतिरिक्त सीईओ गुडेवार यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी त्यावर कार्यवाही सुरू करीत संबंधित सरपंचांना अपात्र करण्याचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सर्व कारभाराची चौकशी करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.

Web Title: Sukhwadi, Malwadi, Tupari, Sandgewadi gram panchayats will be questioned