शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११,६०८ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले

By admin | Updated: August 6, 2016 00:25 IST

कारखानदारांची होणार अडचण : ऊस उत्पादकांना मिळणार योग्य दर; यंदा पळवापळवी

सांगली : दुष्काळ आणि ऊस दरावरून शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून अडवणूक होत असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक अन्य पिकांकडे वळल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. २०१५-१६ वर्षाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखानदारांना ८३ हजार ९६६ हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध झाला होता. चालूवर्षी ११ हजार ६०८ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटल्यामुळे येत्या हंगामासाठी ७२ हजार ३५८ हेक्टर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. परिणामी कारखानदारांमध्ये उसासाठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.संघटनांच्या आंदोलनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील तीन वर्षे चांगला दर मिळाला. पण, २०१५-१६ च्या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले. यातच साखर कारखानदारांकडूनही अडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. पहिल्या हप्त्याचे बिलही संघटना आणि साखर कारखानदारांच्या राजकीय कुरघोड्यात उशिरा मिळाले. काही साखर कारखानदारांनी तर साखरेचे दर उतरल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची दोन महिने बिले दिली नाहीत. जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षाही कमी दर शेतकऱ्यांना दिला आहे. उसाला मिळणारा दर आणि त्याचा उत्पादन खर्च लक्षात घेतल्यास, ते परवडत नसल्यामुळे शेतकरी पर्यायी पिकाकडे वळला आहे. मिरज, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यातील शेतकरी सोयाबीन, भाजीपाला पिकाकडे सर्वाधिक वळला आहे. वाळवा तालुक्यात २०१५-१६ या वर्षात २९ हजार ६०५ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये पाच हजार ४५७ हेक्टरनी उसाचे क्षेत्र घटले असून २०१६-१७ वर्षासाठी २४ हजार १४८ हेक्टर क्षेत्र आहे. तासगाव तालुक्यात सर्वाधिक ५० टक्क्यांनी उसाच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे. या तालुक्यात दुष्काळामुळे ऊसक्षेत्र घटल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरज तालुका वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र घटले आहे. (प्रतिनिधी)