शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Tariff Effect: मिरजेची सतार अमेरिकेत लाखाच्या घरात, निर्यात घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:49 IST

गेल्या तीन महिन्यांपासून तंतुवाद्यांची मागणी थांबली

सदानंद औंधे

मिरज : ‘तंतुवाद्यांचे मोहरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेत तयार होणाऱ्या दर्जेदार तंतुवाद्यांना अमेरिकेच्या वाढीव टेरिफचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेत ५० टक्के आयात कर लावल्याने मिरजेतून होणारी सतार व तांबोऱ्यांची निर्यात केवळ १ ते २ टक्क्यांवर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तंतुवाद्यांची मागणी जवळपास थांबली आहे.

पूर्वी अमेरिकेत ७० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होणारी मिरजेची सतार व तंबोऱ्यांची किंमत आता टेरिफमुळे लाखाच्या घरात पोहोचली आहे. किंमत वाढल्याने अमेरिकेन ग्राहकांची मागणी घटली आहे. निर्यातदार व वाद्य व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. मिरजेतून दरमहा सुमारे ४० सतार व तांबोरे अमेरिकेत पाठविले जात होते. अमेरिकेत भारतीयांची संख्या जास्त असल्याने तिथे तंतुवाद्यांसाठी मोठा ग्राहकवर्ग आहे. 

मात्र ५० टक्के टेरिफ लागू झाल्यानंतर मागणी एकदम कोसळली असून, पूर्वी दिलेल्या ऑर्डरही अनेकांनी रद्द केल्या किंवा थांबविल्या आहेत. मिरजेत तंतुवाद्य व्यवसाय दीडशे वर्षांची परंपरा असून जगभरात येथे तयार होणाऱ्या वाद्यांची ख्याती आहे. दरवर्षी शेकडो वाद्ये अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये निर्यात होतात. कुरिअर व पोस्टाद्वारे ही वाद्ये विदेशात पाठविली जातात. मात्र गेल्या तीन महिन्यांत अमेरिकेत निर्यात होणारी वाद्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहेत.

निर्यातीचा खर्चही वाढला

आता तंतुवाद्ये कुरिअरद्वारे अमेरिकेत पाठविण्यापूर्वी टेरिफ भरावे लागत असल्याने खर्चही वाढला आहे. याचा तंतुवाद्य निर्मात्यांना आर्थिक फटका बसला आहे.

व्यावसायिकांची केंद्र शासनाकडून अपेक्षा

अमेरिकन टेरिफचा मिरजेतील तंतुवाद्य उद्योगाला तडाखा बसला असून, मिरजेतील व्यावसायिक केंद्र सरकारकडून व्यापार कराराद्वारे उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेतून एकही नवीन ऑर्डर येत नाही. पाठवण्यापूर्वी कर भरावा लागतो. भारत-अमेरिका व्यापार करारातून तोडगा निघेल, अशी आम्ही अपेक्षा करतो. टेरिफ कायम राहिल्यास तंतुवाद्य व्यवसाय संकटात येणार आहे. - मोहसीन मिरजकर, तंतुवाद्य निर्माते, मिरज

English
हिंदी सारांश
Web Title : Miraj Sitar Exports Plunge as US Tariffs Hit Hard

Web Summary : US tariffs devastate Miraj's sitar industry. Exports plummeted due to 50% import tax. Prices soared, demand crashed, affecting artisans. Trade deal sought.