Sangli: जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या गाडीसह बंगल्यावर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:27 IST2025-12-02T19:26:17+5:302025-12-02T19:27:08+5:30

Local Body Election: परिसरात तणावाचे वातावरण

Stones pelted at the car and bungalow of Jat mayoral candidate Suresh Shinde | Sangli: जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या गाडीसह बंगल्यावर दगडफेक

Sangli: जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या गाडीसह बंगल्यावर दगडफेक

जत : राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या गाडी व बंगल्यावर रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात सुरेश शिंदे यांचा मुलगा निखिल शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. दगडफेकीत गाडीचे पुढील काचेसह काही भाग नुकसानग्रस्त झाले. 

ही घटना निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घडल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या हल्ल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप रंगलेले दिसून येत आहे. जत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.

Web Title : सांगली: जत में उम्मीदवार के घर और गाड़ी पर पथराव।

Web Summary : जत में राकांपा उम्मीदवार सुरेश शिंदे के घर और गाड़ी पर अज्ञात लोगों ने पथराव किया। शिकायत दर्ज होने के बाद पुलिस मामले की जांच कर रही है। घटना से इलाके में तनाव है और गाड़ी क्षतिग्रस्त हो गई है।

Web Title : Sangli: Stone pelting at candidate's house and car in Jat.

Web Summary : Unknown individuals pelted stones at NCP candidate Suresh Shinde's house and car in Jat. Police are investigating the incident after a complaint was filed. The incident has created tension in the area and damaged the car.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.