शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील विभुतवाडीत शिंदेसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक, आटपाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:07 IST

कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याची पोलिसांत तक्रार

आटपाडी : तालुक्यातील विभुतवाडी येथे निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विभुतवाडी बसस्थानकाजवळ ही घटना घडली. याबाबत हेमंत तुकाराम मोटे (वय २५, व्यवसाय नोकरी, रा. विभुतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हेमंत मोटे हे सदर ठिकाणी उभे असताना शिंदेसेनेच्या वतीने प्रचारासाठी वापरण्यात येणारे वाहन तेथे उभे होते. संबंधित वाहनाचा चालक जवळच चहा पिण्यासाठी गेला होता. त्याचवेळी काही अंतरावर भाजप पक्षाच्या वतीने प्रचार सुरू होता.

याचदरम्यान एक अनोळखी इसम फिर्यादीजवळ येऊन शिंदेसेनेच्या प्रचार वाहनाच्या स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगू लागला. त्यावर फिर्यादीने वाहन चालक चहा पिण्यास गेला असल्याचे सांगितले. यानंतर अचानकपणे त्याठिकाणी दोन वाहने आली. या वाहनांतून ३ ते ४ अनोळखी व्यक्ती उतरल्या. त्या व्यक्तींनी शिवसेनेच्या प्रचार वाहनावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. या दगडफेकीत प्रचार वाहनाचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, घडत असलेली घटना फिर्यादी हेमंत मोटे हे आपल्या मोबाइलमध्ये शूट करत असताना, त्यातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हाताला धरून त्यांना बाजूला ओढले व धक्काबुक्की केली. त्यावेळी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत फिर्यादीला सुरक्षित ठिकाणी नेले. या घटनेनंतर शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, निवडणूक प्रचारादरम्यान अशा प्रकारच्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध केला आहे. निवडणूक काळात शांतता राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची दगडफेक व धक्काबुक्की ही लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stone pelting on Shinde Sena's vehicle in Sangli, case filed.

Web Summary : During election campaigning in Sangli's Vibhutwadi, Shinde Sena's vehicle was attacked with stones. An unidentified person asked to reduce the speaker volume, followed by the arrival of individuals who vandalized the vehicle. A case has been registered at Atpadi police station.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस