शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात आलाय नाग, कुठे गेला वाघ?

By admin | Updated: October 21, 2014 00:20 IST

शिवाजीराव नाईक यांची बाजी

विकास शहा - शिराळा -शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातून मोठे मताधिक्य घेण्याची जयंतराव पाटील यांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे ‘शिराळ्यात नाग आला, मात्र वाघ गेला कोठे’? अशी प्रतिक्रिया उमटत आहे. या निवडणुकीत तीन गट वेगवेगळे लढले. यामध्ये ‘कमळ’ फुलून शिवाजीराव नाईक यांनी पुन्हा आपली ताकद दाखवून दिली. तसेच कॅबिनेट मंत्रीपदाचे ते दावेदार झाले आहेत.१९९५ पासून शिवाजीराव नाईक यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यावेळी पहिल्यांदा फत्तेसिंगराव नाईक यांच्याबरोबर युती करून विजय मिळविला. १९९९ मध्ये हीच परिस्थिती होती. मात्र २00४ मध्ये मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख व शिवाजीराव नाईक हे वेगवेगळे लढले. यामध्ये शिवाजीराव नाईक श्रेष्ठ ठरले. २00९ मध्ये देशमुख—मानसिंगराव नाईक गट एकत्र आले. यामध्ये मानसिंगराव यांनी शिवाजीरावांचा पराभव केला.यानंतर राजकारणाचे वारे फिरले. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश या विधानसभा निवडणुकीत उपयोगी पडले. आघाडी—युती तुटली. यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांना आपली ताकद अजमावण्याची संधी मिळाली. सत्यजित देशमुख यांच्यासाठी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी जंग जंग पछाडले. प्रत्येक गावात भेटी दिल्या, फोनवरून मतदारांशी संवाद साधला, तसेच त्यांचा मुक्कामही याच मतदारसंघात राहिला. नारायण राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, मुझफ्फर हुसेन यांच्या सभा घेतल्या. तसेच शिवाजीराव नाईक यांनी नितीन गडकरी, स्मृती इराणी या केंद्रीय मंत्र्यांच्या सभा घेतल्या. मानसिंगराव यांच्यासाठी खा. सुप्रिया सुळे, जयंतराव पाटील यांच्या सभा झाल्या. प्रत्येकजण आपापली ताकद खर्च करीत होता. मात्र शिवाजीराव यांनी बाजी मारली. याचबरोबर गडकरी यांनी, ‘शिवाजीरावांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्री करतो’, अशी घोषणा केली होती. त्यामुळे गडकरी यांनी दिलेला शब्द पाळला, तर शिवाजीरावांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची आशा आहे.मानसिंगरावांसाठी जयंतरावांची शर्थजयंतराव पाटील यांनी मानसिंगराव यांना विजयी करण्यासाठी जंगजंग पछाडले होते. त्यांच्या मतदारसंघापेक्षा जास्त सभा, बैठका त्यांनी शिराळा मतदारसंघात घेतल्या होत्या. ‘जयंतराव’ हा वाळव्याचा वाघ, तर शिवाजीराव हे शिराळ्याचा नाग म्हणून संबोधले जातात. शिवाजीराव यांनी बाजी मारल्याने वाळव्याचा वाघ कोठे गेला? या वाघाने ५0 हजारांचे मताधिक्य देण्याचे जाहीर केले होते. ‘नाग आला, मात्र वाघ कुठे गेला?’ अशा प्रतिक्रिया येथे उमटत आहे.