शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहांसाठी सह्यांची मोहीम

By admin | Updated: November 22, 2014 00:01 IST

सुधार समितीची बैठक : महिलांची कुचंबणा थांबविण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्णय

सांगली : महिला स्वच्छतागृहांसाठी जिल्ह्यातील ५० हजार सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांंना देण्याचा निर्णय आज (शुक्रवार) येथे झालेल्या जिल्हा सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर महिला स्वच्छतागृहांसाठी टप्प्या-टप्प्याने संपूर्ण जिल्हाभरात व्यापक आंदोलन उभारण्याचाही यावेळी निर्णय घेण्यात आला. येथील ‘कष्टकऱ्यांची दौलत’मध्ये महिला स्वच्छतागृह या विषयावर विविध महिला संघटनांची बैठक झाली. यामध्ये अनेक सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. या बैठकीला अ‍ॅड. रमा सरोदे (पुणे), मुमताज शेख (मुंबई), ‘संग्राम’च्या अध्यक्षा मीना शेषू, प्रा. नंदा पाटील, निमंत्रक अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. मेधा पानसरे (कोल्हापूर), रवींद्र चव्हाण, शाहीन शेख आदी उपस्थित होते. मुमताज शेख म्हणाल्या की, महापालिका कर घेते, मात्र महिलांना मूलभूत सुविधा देत नाही. स्वच्छतागृहांची बोगस आकडेवारी दिली जाते. मात्र प्रत्यक्षात स्वच्छतागृहांची संख्या हातावर मोजण्याइतपतही नाही. यासाठी महिलांंनी संघटितरित्या लढा उभारण्याची गरज आहे. पुरुषांची स्वच्छतागृहे ताब्यात घेण्यासारखी आंदोलने उभारली पाहिजेत. महिला स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन महिलांनीच केले पाहिजे. नगरसेवक ते खासदारांपर्यंत असणाऱ्या फंडाच्या निधीतील काही वाटा हा महिलांची स्वच्छतागृहे उभारण्यासाठी खर्च केला पाहिजे. मीना शेषू म्हणाल्या की, महिलांच्या स्वच्छतागृहांकडे कोणी गांभीर्याने बघत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हा प्रश्न महिलांच्या आरोग्याशी निगडीत असताना, याकडे कानाडोळा करून राजकारणी महिलांच्या आरोग्याशी खेळत आहेत. यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढा उभारला पाहिजे. अ‍ॅड. सरोदे म्हणाल्या की, महिलांच्या अनेक हक्कांचे उल्लंघन केले जाते. स्वच्छतागृहांचाही महत्त्वाचा प्रश्न आहे. पुरुषांची स्वच्छतागृहे ताब्यात घेतल्याशिवाय महिलांचे दु:ख समजणार नाही. यासाठी महिलांनी संघटितरित्या व्यापक लढा उभारला पाहिजे. यासाठी महिलांनी एकत्र यावे.अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून ५० हजार सह्या घेऊन त्याचे निवेदन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात येईल. ही प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.शाहीन शेख म्हणाले की, आता यापुढे प्रत्येक प्रभागात स्वच्छतागृहे उभारण्यासाठी घरावर काळे झेंडे लावण्यात येतील. त्यानंतर कर न भरण्याचा निर्णय घेण्यात येईल. यामध्ये सर्व समविचारी पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. आर. बी. शिंदे, पद्मजा मगदूम, डॉ. विशाल मगदूम, अरुणा शिंदे, प्रा. सुभाष दगडे, मनिता पाटील, धनंजय भिसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पेठभागातील स्वच्छतागृह ताब्यात येथील पेठभागातील भाजी मंडईमध्ये दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने स्वच्छतागृह बांधले असतानाही, ते वापरास खुले करण्यात आलेले नव्हते. कुलूप व नटबोल्ट लावून ते बंद करण्यात आले होते. आज सकाळी सुधार समितीमधील महिला सदस्यांनी कुलूप काढूून हे स्वच्छतागृह ताब्यात घेतले. या ठिकाणी पाण्याची महापालिकेने कायमस्वरुपी व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली. भाजी मंडईमधील महिलांसाठी आजपासून या स्वच्छतागृहाचा वापरही सुरु करण्यात आला.