शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पाण्याची शुद्धता वाऱ्यावरच

By admin | Updated: July 25, 2014 23:36 IST

गढूळ, मातीमिश्रित पाणीपुरवठा : आवश्यक तपासणी नाही

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहरातील पाच लाख लोकसंख्येला पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता कोणत्याही कसोटीवर खरी उतरण्याची शक्यता नाही. महापालिकेकडून दररोज पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत जातात. काही मोजक्याच चाचण्या करून अहवाल दिला जाते, पण या चाचणीत पाणी दूषित निघतच नाही. उलट नागरिकांना मात्र कधी मातीमिश्रित, तर कधी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेविषयी नागरिकही साशंक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सांगली व कुपवाड शहराला मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. नळाला लालभडक पाणी आल्याने महापालिकेच्या शुद्धीकरण यंत्रणेचे पितळ उघडे पडले. त्यात नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील तीनपैकी दोन बेड बंद होते. एका बेडवरून पाणी शुद्ध करून पुरवठा होत होता. हा प्रकार गेले कित्येक दिवस सुरू आहे. माळबंगला येथील शुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक क्लॅरिफायर व एक फिल्टर बेड बंद आहे. त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. वास्तविक दुरुस्तीचे काम गेल्या काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. म्हणजेच काम सुरू झाल्यापासून सांगलीकरांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला, असेच म्हणावे लागेल. तरीही पाण्याचे नमुने कधीच दूषित आढळले नाहीत. जून महिन्यात केलेल्या चाचणीत एकदाही दूषित पाणी आढळले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मातीमिश्रित गढूळ पाणी नागरिकांच्या गळी उतरवूनही, प्रशासन मात्र हे पाणी पिण्यालायक असल्याचे सांगत आहे. वास्तविक महापालिकेकडून दररोज वेगवेगळ्या भागातील पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. सांगलीत १० ते ११ जागी, तर मिरजेत पाच ठिकाणचे नमुने घेतले जातात. पंधरा ते सोळा नमुन्यांपैकी सात ते आठ नमुनेच प्रयोगशाळेकडे जातात. महिन्याची सरासरी पाहिल्यास, दरमहा पाण्याचे २५० नमुने प्रयोगशाळेकडे जात आहेत. महापालिकेकडे पाणी तपासणीची कसलीही यंत्रणा नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतच पाण्याच्या नमुन्यांची तपासणी होते. प्रयोगशाळेत शुद्ध पाण्यासाठी प्रमाणकानुसार ६५ तपासण्या करण्याची गरज आहे. वस्तुत: केवळ वीसच तपासण्या केल्या जातात. त्यामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा शुद्ध होतो का, असा प्रश्न समोर उभा आहे. (प्रतिनिधी)पाण्याच्या शुद्धीकरण यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड झालेला आहे. त्यात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पूर्ण क्षमतेने पाणी शुद्ध होत नाही. त्यासाठी महापालिकेकडून तुरटी व क्लोरिनचा बेसुमार वापर केला जात असल्याची तक्रार नागरिकांतून केली जात आहे. त्याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून पोटाचे विकार वाढल्याचेही सांगण्यात आले. ओ. टी., पी. एच, एमपीएन, टर्बिडिटी, टोटल हार्डनेस, डिझॉल्व्ह सॉलिझन, नाईट्रेट, अल्कलिनिटी, क्लोराईडस्, फ्लोराईडस्च्या तपासण्या प्रयोगशाळेत केल्या जातात.४जून महिन्यात महापालिकेच्या पाणीपुरवठ्यादरम्यान तपासणी केलेल्या २५० नमुन्यात एकही नमुना दूषित आढळला नाही. ४महापालिकेकडून सांगलीतील दहा व मिरजेतील पाच ठिकाणचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले जातात४पाण्यातील जडत्वासह (हार्डनेस) विविध रासायनिक तपासण्या महिन्यातून एकदाच केल्या जातात४शासकीय रुग्णालयातील पाण्याच्या पुरवठ्याचे स्वतंत्र नमुने रुग्णालय प्रशासनाकडून पाठविले जातात४पाण्यामध्ये तुरटी क्लोरिनचे प्रमाण निश्चित असते. त्यासाठी पालिकेकडे एक केमिस्ट पदही आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून हे पद रिक्त आहे. पुरवठा विभागातील कर्मचारी अंदाजेच तुरटी, क्लोरिनचा वापर करतात.